येवल्यातील व्यावसायिकांना जागा आखून देणार! 

yeola2
yeola2

येवला : येथील पालिकेला लाभलेल्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांनी शहरातील बेशिस्त अतिक्रमणाला वळण लावण्यासाठी हाती घेतलेल्या मोहिमेचे स्वागत होत आहे. विस्कळीतपणा टाळण्यासाठी रोजच अतिक्रमणावर लक्ष केंद्रित केले आहे.आता व्यावसायिक उघड्यावर येऊ नये यासाठी त्यांनी व्यावसायिकाना शनीपटागणांत जागा आखून देण्याचा निर्णय घेतला असून व्यावसाच्या प्रकारानुसार जागा निच्छित करून दिली जाणार आहे.

पालिकेकडे आलेल्या तक्रारीची दखल घेत नांदुरकर यांनी सोमवार पासून अतिक्रमणाला केंद्र केले आहे.सोमवारी येथील मध्यरात्री शहरातील २५० अतिक्रमित टपऱ्या,हातगाडे व इतर अतिक्रमण हलवल्यानंतर गुरुवारी पुन्हा  सायंकाळी मोहीम राबवत कुणाचीच गय केली जाणार नाही असा इशाराच मुख्याधिकारी नांदूरकर यांनी दिला आहे.

विंचूर चौफुलीसह शनी पटांगण,मेन रोड, आठवडे बाजार आदी भागांमध्ये गेल्या काही वर्षांपासून असलेल्या गुंतागुंतीच्या दुकाने व हातगाड्यांना आता शिस्त मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

नव्याने साकारलेल्या व्यापारी संकुलालगतही व्यापारी गाळ्यांचे लिलाव झाल्यानंतरही अतिक्रमणवाल्यानी आपल्या टपऱ्या हलविल्या नव्हत्या.यामुळे गाळे पालिकेकडून लिलावात घेतले होते,त्यांनीही पालिकेचे याकडे लक्ष वेधले होते. नांदूरकरांच्या धडक मोहीमेमुळे या संकुलातील व्यवसायिकांनाही दिलासा मिळाला आहे.विंचूर चौफुलीवरही नगर - मनमाड राज्य मार्गानेही थोडा मोकळा श्वास आज घेतला आहे.सोमवारी मध्यरात्री कुणालाही कल्पना नसताना मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी कुठलाही पोलिस बंदोबस्त न घेता २५० अतिक्रमित टपऱ्या हलविल्या.पुन्हा गुरुवारी सायंकाळी जेसीबी मशीन घेऊन भाजी मार्केट जवळील २ इंद्रनील कॉर्नरसमोरची एक मोठी टपरी काढण्यात आली.

भाजीबाजाराला शिस्त
गुरुवारी सायंकाळी व आज शुक्रवारी सकाळी तसेच सायंकाळी देखील नांदुरकर यांनी अतिक्रमणाकडे लक्ष केंदित केले आहे.विशेष म्हणजे व्यावसायिक उघड्यावर येणार नाही याची काळजी घेत त्यांनी जागा आखून देण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे.आज सकाळी शनी पटांगणलगत त्यांनी भाजी बाजार लक्ष केला.सुसज्ज भाजीपाला मार्केट उभारण्यात आलेले असतानाही भाजीपाला विक्रेते मार्केटची बांधलेली इमारत सोडून बाहेर भाजीपाला विक्रीसाठी बसत होते.आज सकाळी मुख्याधिकारी नांदूरकर यांनी शनी पटांगणावर बाहेर बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना मार्केटच्या इमारतीत बसण्यास भाग पाडले.भाजीपाला विक्रेत्यानाही मुख्याधिकार्यांनी शिस्त लावल्याने आज अनेक वर्षांनंतर या परिसराने मोकळा श्वास घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com