जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे आज धरणे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

नाशिक - लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी वर्ग दोनचे पद निर्माण करण्याच्या 15 मागण्यांसाठी जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी मंगळवारी (ता. 13) जिल्हा परिषदेसमोर सकाळी आंदोलन करणार आहेत.

नाशिक - लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी वर्ग दोनचे पद निर्माण करण्याच्या 15 मागण्यांसाठी जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी मंगळवारी (ता. 13) जिल्हा परिषदेसमोर सकाळी आंदोलन करणार आहेत.

राज्यात एकूण पाच हजार लिपिकवर्गीय कर्मचारी असून, राज्यात एकाचवेळी आंदोलन करणार आहेत. नाशिकला जिल्हा परिषदेसमोर जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे राज्याचे मुख्य सचिव बापूसाहेब कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली धरणे धरले जाणार आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, अनिल बाबर यांच्यासोबत नोव्हेंबरमध्ये झालेल्या बैठकीचे इतिवृत्त मिळावे, जॉब चार्ट, वेतनश्रेणी, पदोन्नतीसह विविध मागण्यांबाबत निर्णयाची अंमलबजावणीची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: District employees hold ministerial conference today