जिल्हास्तरीय आदर्श आशा प्रवर्तक पुरस्कार स्वाती जाधव यांना प्रदान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

खामखेडा (नाशिक) : नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०१६-१७ साठी दिला जाणारा प्रथम क्रमांकाचा जिल्हा स्तरीय आदर्श आशा प्रवर्तक पुरस्कार खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या विठेवाडी (ता. देवळा) उपकेंद्रातील आशा प्रवर्तक स्वाती विवेक जाधव यांना शुक्रवारी (ता. १२) नाशिक येथील अस्मिता मेळाव्यात जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाघचौरे यांच्या हस्ते नुकताच प्रधान करण्यात आला.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते सभापती मनीषा पवार अर्पण खोसकर सुनिता चारोस्कर,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर व्ही एम होले यांच्या उपस्थितीत जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाघचौरे यांच्या हस्ते आशा प्रवर्तक स्वाती विवेक जाधव यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देत गौरविण्यात आले.

रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्ष जि प सदस्या धनश्री आहेर, तालुका पंचायत समितीच्या सभापती सौ कुसुमताई अहिरे ,देवळा तालुका वैद्यकीय अधिकारी सुभाष मांडगे, खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रवींद्र खैरनार, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी टी के जाधव, तालुक्यातील आशा स्वयंसेविका, अमित आहेर यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: district level asha pravartak award goes to swati jadhav