चाळीसगाव: दिवाकर नलावडे 42 वर्षांपासून करताहेत जनसेवा !

दीपक कच्छवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

भवाळी गाव कावीळ मुक्त..
आयुर्वेदचार्य दिवाकर नलावडे यांच्या उपचारामुळे  भवाळी गावात सध्या कावीळचा एकही रूग्ण नाही.कावीळ हा दुषित पाण्यामुळे होणारा आजार आहे.असे श्री नलावडे सांगतात.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : कावीळसारखा अजार म्हटला, तर अंगाला काटे येतात.काही वेळा कावीळमुळे रुग्णांची परिस्थिती गंभीर होते.या आजारावर उपचाराची आयुर्वेदात मोठी शक्ती असल्याचे भवाळी (ता.चाळीसगाव) येथील 83 वर्षीय आयुर्वेदचार्य दिवाकर नलावडे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.त्यांची विनामूल्य खात्रीलायक सेवा कौतुकाचा विषय ठरली आहे. 
 
जामदा (ता.चाळीसगाव)  गावापासून सहा किलोमीटरवरील पंधराशे लोकसंख्याच्या भवाळी (ता.चाळीसगाव)गावात आयुर्वेदचार्य कांतीलाल बाबा यांचे शिष्य दिवाकर केशवराव  नलावडे यांच्याकडून पिवळा कावीळ व पांढरा काविळसारख्या आजारावर विनामूल्य उपचार केले जातात.त्यासाठी राज्यातील नव्हे तर  घेण्यासाठी दुबई, कर्नाटक, येथुन कावीळचे रूग्ण येत असतात. काविळ आजाराचे निदान होवुन रूग्ण बरे होत असल्याने या ठीकाणी रूणांची गर्दी होते.श्री नलावडे यांनी  1976 पासुन ही जनसेवा सुरू केली आहे.अवघ्या दहा दिवसाच्या बाळापासुन  90 वर्षाच्याहीपेक्षा अधिक वयाचे रूग्ण त्यांच्याकडे आयुर्वेदिक डोस घेण्यासाठी येतात.श्री नलावडेबाबांनी कुठलीहे वैद्यकीय शिक्षण घेतलेले नाही.त्यांना जणु काही नैसर्गिक शक्ती प्राप्त असल्याची परिसरात  चर्चा आहे.ही सेवा ते तब्बल 42 वर्षापासून विनामूल्य करीत आहेत.आजच्या स्वार्थी जीवनात निस्वार्थीपने सेवा करण्याचा जणूकाही त्यांच्या कुटुंबीयांनी  'विडा' च उचलला आहे. सकाळी साडेसातपासून रुग्णांची येथे गर्दी होते. या कामात त्यांना  कुटुंबातील भाऊ मोहन नलावडे,  मुलगा शहाजी व सूनबाई भारती यांची औषध तयार करण्यासाठी मदत होते.त्यांच्याकडे दक्षिण आफ्रिकेतील उपचारासाठी एक रूग्ण येवुन गेला असल्याचे त्यांनी सांगितले.या ठीकाणी इतर दिवसापेक्षा रविवारी अधिक गर्दी होते.

भवाळी गाव कावीळ मुक्त..
आयुर्वेदचार्य दिवाकर नलावडे यांच्या उपचारामुळे  भवाळी गावात सध्या कावीळचा एकही रूग्ण नाही.कावीळ हा दुषित पाण्यामुळे होणारा आजार आहे.असे श्री नलावडे सांगतात.

आयुर्वेदात खुप मोठी शक्ती आहे. काविळचा एक डोस घेतला व त्याचे पथ्य ठेवले तर शंभर टक्के आजार बरा होतो. कावीळची लागण झालेले रूग्ण बरे झाल्यानंतर मला त्यातच समाधान लाभते. 
- दीवाकर नलावडे, आयुर्वेदचार्य भवाळी (ता.चाळीसगाव)

Web Title: Divakar Nalawade social work in Chalisgaon