अस्ताणेत यंदा ज्ञानेश्‍वरी पारायणाची शंभरी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

विराणे - अस्ताणे (ता. मालेगाव) हे माळमाथ्यावरील प्रगतिशील व आध्यात्मिक वारसा लाभलेले गाव. अनेक वर्षांपासून येथे माध्यमिक शाळा असल्याने गावात नोकरदारांची संख्या मोठी. ब्रिटिश राजवटीपासून सुरू झालेला समाजप्रबोधनपर ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा आजही अखंडपणे सुरू आहे. कीर्तन केसरी कोमलसिंग महाराज सुराणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 5 नोव्हेंबरपासून सुरू झालेला यंदाचा सोहळा हा शंभरावा आहे. या आध्यात्मिक परंपरेमुळे गावात पाच ते सहा कीर्तनकार तयार झाले. 

सोहळ्यातून ग्रामस्वच्छता, शेतकऱ्यांचे प्रबोधन, आत्महत्येपासून परावृत्त करणे, लेक वाचवा-लेक शिकवा, वृक्षारोपण अशा विविध विषयांवर ग्रामस्थांचे प्रबोधन केले जाते. पंधरा वर्षांखालील मुलांकडून संस्कृतचे पठण करून घेतले जाते. काकड आरती, ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पठण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन अशा दिवसभर व्यस्त कार्यक्रमांनी सोहळा सुरू आहे. या काळात गावात उत्साहाचे वातावरण घराघरांत असते. हा देखणा सोहळा पाहण्यासाठी प्रत्येक घरी नातलगांची गर्दी असते. रामायणाचार्य मच्छिंद्र महाराज, शिवचरित्रकार मधू महाराज, विद्यावाचस्पती समाधान महाराज, प्रा. चक्रभूज महाराज आदी नामांकितांच्या कीर्तनांचे आयोजन करण्यात आले आहे. 12 नोव्हेंबरला सोहळ्याची सांगता परिसरातील जनतेला महाप्रसाद देऊन होईल. या सोहळ्याबाबत परिसरातील जनतेत मोठ्या प्रमाणात उत्सुकता असते. धुळे, नाशिक जिल्ह्यातील वारकरी मोठ्या प्रमाणात येथे हजेरी लावतात. 

पारायणातून गावकऱ्यांचे प्रबोधन, शंभर वर्षांच्या परंपरेने गावावर झालेले आध्यात्मिक संस्कार, घराघरांतील उत्साहाचे वातावरण पाहून मनस्वी आनंद होतो. 
- पृथ्वीराज शिरसाठ, अस्ताणे. 

Web Title: Dnyaneshwari parayan centenary