बारावीच्या उत्तरपत्रिका नाही तपासणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

नाशिक - कनिष्ठ महाविद्यालयांच्या अनुदानासह शिक्षकांच्या वेतनाच्या प्रश्‍नांवर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मागण्यांच्या निर्णयाचा चेंडू अर्थ मंत्रालयाकडे टाकला. अर्थ मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका श्री. तावडे यांनी घेतल्याने आज मंत्रालयातील चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार कायम ठेवला आहे, असा इशारा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने दिला आहे. 

याबाबत महासंघाचे सरचिटणीस प्रा. संजय शिंदे म्हणाले, ""शालेय शिक्षणमंत्री, प्रधान सचिव नंदकुमार, आयुक्त धीरजकुमार यांच्याशी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख, कार्याध्यक्ष प्रा. अविनाश तळेकर, उपाध्यक्ष प्रा. अविनाश बोर्डे आदी उपस्थित होते. विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचे मूल्यांकन झाले आहे. त्यात पात्र ठरलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान देण्याची मागणी महासंघातर्फे करण्यात आली. राज्यातील 476 कनिष्ठ महाविद्यालयांसह सतराशे शिक्षकांशी निगडित हा विषय आहे. राज्यात सद्यःस्थितीत वेतनाविना जवळपास सात हजार शिक्षक अध्यापन करीत आहेत. त्यांच्या वेतनाचा प्रश्‍न कायम आहे. 2011-12 पासून पायाभूत पदांवर विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांच्या पदांना मान्यता देऊन वेतन सुरू करण्याची मागणी प्रलंबित आहे. हा विषय बाराशेपर्यंत शिक्षकांशी निगडित आहे.'' 

बारावीची परीक्षा आम्ही सुरळीतपणे पार पाडणार आहोत. उत्तरपत्रिका तपासणीला 3 मार्चपासून सुरवात होईल. तोपर्यंत सरकारने महासंघाच्या मागण्यांचा सकारात्मक तोडगा दिल्यास उत्तरपत्रिका तपासणीची अडचण दूर होऊ शकते. मात्र, सरकार आपल्या भूमिकेवर कायम राहिल्यास उत्तरपत्रिका न तपासण्याचा प्रश्‍न अनुत्तरीत राहील, असेही प्रा. शिंदे यांनी सांगितले. 

Web Title: Do not check papers of HSC