Sakal Exclusive : वैद्यकीय कौशल्य पणाला; नंदुरबार येथील डॉक्टरांनी केली करामत!

Nandurbar: Dr. present at the discharge of Nikesh Padavi. Yogeshwar Chaudhary. Neighbor Nikesh's family, hospital staff
Nandurbar: Dr. present at the discharge of Nikesh Padavi. Yogeshwar Chaudhary. Neighbor Nikesh's family, hospital staffesakal

Nandurbar News : नंदुरबार येथील छत्रपती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गंभीर व बेशुद्धावस्थेत उपचारासाठी दाखल झालेल्या युवकावर यशस्वी उपचार करण्यात आले.

संबंधित युवकाला मेंदूज्वर तर झालाच होता शिवाय तो मेंदूचा क्षयरोग या दुर्धर आजारानेदेखील ग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्याचा जीव धोक्यात आला होता.

मात्र डॉक्टरांनी वैद्यकीय कौशल्य पणाला लावून त्या युवकाचा जीव वाचविला आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टर व सर्व स्टाफचे कौतुक करण्यात येत आहे. (Doctors at Nandurbar Successful treatment of encephalitis brain tuberculosis in youth nandurbar news)

Nandurbar: Dr. present at the discharge of Nikesh Padavi. Yogeshwar Chaudhary. Neighbor Nikesh's family, hospital staff
Jalgaon NCP News : संजय पवार अखेर राष्ट्रवादीतून बडतर्फ

तळोद्यातील सतरावर्षीय युवक निकेश कन्हय्या पाडवी याला काही दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे निकेशच्या कुटुंबीयांनी त्याला स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले, मात्र ताप कमी न झाल्यामुळे त्यांनी भुताटकीचा प्रकार समजून त्याच्यावर विविध बाबा, बुवा, भगत यांच्याकडून उपचार सुरू केले. त्याची तब्येत सुधारण्याऐवजी आणखी खालावत गेली.

अत्यंत गंभीर अवस्थेत त्याला येथील खासगी हॉस्पिटलला नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मुंबई किंवा सुरत येथे उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला कुटुंबीयांना दिला. मात्र त्याच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती हलाखीची होती, तसेच त्याची तब्येतदेखील खूपच खालावली होती.

अशा वेळी निकेशचे नातेवाईक तथा सामाजिक कार्यकर्ते योगेश अरविंद पाडवी यांनी नंदुरबार येथील छत्रपती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे हृदयरोग, मधुमेह, अतिदक्षतातज्ज्ञ, फिजिशियन डॉ. योगेश्वर चौधरी यांच्याशी संपर्क साधला. डॉक्टरांनी त्वरित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nandurbar: Dr. present at the discharge of Nikesh Padavi. Yogeshwar Chaudhary. Neighbor Nikesh's family, hospital staff
Trending News : हौस म्हणून मानेवर काढला टॅटू; पण झालं असं काही की हौस अंगलट आली...

बेशुद्ध व मरणासन्न अवस्थेत पोचलेल्या निकेशला १२ मेस छत्रपती मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल करून, डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केले. विविध तपासणीअंती त्याला मेंदूज्वर तर झालाच होता शिवाय तो मेंदूचा क्षयरोग या दुर्धर आजारानेदेखील ग्रस्त असल्याचे निदान झाले.

त्यातच अचानक मेंदूतील दाब वाढल्याने त्याचे हृदयाचे ठोके अत्यंत कमी झाले होते. अशा गंभीर परिस्थितीत रुग्ण वाचण्याची शक्यता अत्यंत कमी असते व मृत्युदरदेखील अधिक असतो. मात्र हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉ. योगेश्वर चौधरी व डॉ. रोशन भंडारी यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. हॉस्पिटलचा स्टाफदेखील रात्रंदिवस त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होता.

शेवटी सर्वांच्या अथक प्रयत्नाने निकेश मृत्यूच्या दाढेतून परत आला व बरा झाला. बुधवारी (ता. १७) त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या वेळी निकेश व त्याच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद, तर रुग्णालयातील स्टाफच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

Nandurbar: Dr. present at the discharge of Nikesh Padavi. Yogeshwar Chaudhary. Neighbor Nikesh's family, hospital staff
Jalgaon News : आला..रे आला मन्या आला अन्‌ माफी मागुन गेला; वाळू माफियाचा बिंधास्त स्टंट

रुग्णाला भगताकडे नेणार नाही

मोठ्या शहरांसारखीच वैद्यकीय सेवा निकेशला नंदुरबार येथे योग्य वेळेवर मिळाली, त्यामुळे त्याचा जीव वाचला. कुलदैवत देवमोगरा माता, डॉ. योगेश्वर चौधरी, डॉ. रोशन भंडारी व सर्व टीमच्या प्रयत्नाने आमच्या मुलाला जीवनदान मिळाले, अशी उत्स्फूर्त व आनंददायी प्रतिक्रिया निकेशच्या कुटुंबीयांनी डिस्चार्जप्रसंगी दिली.

यापुढे कोणत्याही रुग्णाला बाबा, भगत यांच्याकडे न नेता त्वरित दवाखान्यात उपचारासाठी दाखल करू, अशी ग्वाहीदेखील दिली.

"अत्यंत गंभीर व मरणासन्न अवस्थेतील रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल झाला. कमी वयाचा रुग्ण असल्याने रुग्णाप्रति सहानुभूती होती. आतापर्यंत मुंबईतील मोठ्या रुग्णालयात केलेल्या कामाचा अनुभव व कौशल्य पणाला लावून रुग्णावर चिकित्सा केली व त्यात यश आले."

-डॉ. योगेश्वर चौधरी.

Nandurbar: Dr. present at the discharge of Nikesh Padavi. Yogeshwar Chaudhary. Neighbor Nikesh's family, hospital staff
Jalgaon NCP News : संजय पवार अखेर राष्ट्रवादीतून बडतर्फ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com