कागदपत्रे न्यायालयातून गायब; गुन्हा मात्र चिखलीकर विरोधात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

नाशिक - सार्वजनिक बांधकाम विभागाचा लाचखोर अभियंता सतिश चिखलीकर प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोप पत्रातील तक्रारदाराची तक्रार व पंचांच्या निशाण्यांचा दस्तऐवजच गहाळ झाला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सतिश चिखलीकर यालास आरोपी केल्याने आश्‍चर्य व्यक्त होते आहे. प्रत्यक्षात न्यायालयाच्या ताब्यात दोषारोपपत्र असताना, त्याची जबाबदारी संबंधितांची होती तरीही सरकारवाडा पोलिसांनी यात लाचखोर चिखलीकर याच्याविरोधात कागदपत्रे गहाळ केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत, अजब पोलिसी कारभाराचा नमुना पेश केला. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सतिश चिखलीकर यांना गेल्या मे 2013 मध्ये 22 हजार रुपयांच्या लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यानंतर कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्तेची माया पोलिसांनी जप्त केली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. मात्र या दोषारोपपत्रातील तक्रारदाराची मूळ तक्रार, पंचांच्या निशाण्यांचा दस्तऐवजच गहाळ झाला आहे. तर मूळ दस्तऐवजाऐवजी बनावट दस्त दोषारोपपत्रात घुसविण्यात आले आहेत. त्या बनावट दस्तावर कोणाच्याही स्वाक्षऱ्या नाहीत. सदरच्या प्रकरणाची जिल्हा व सत्र न्यायालयाने गंभीर दखल घेत, याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. 

त्यानुसार, न्यायालयीन प्रबंधक दिलीप जाधव यांनी सरकारवाडा पोलिसात फिर्याद दिली आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करताना दस्तऐवज गहाळ झाल्याच्या गुन्ह्यात लाचखोर सतिश चिखलीकर यास आरोपी केले आहे. मुळात कागदपत्रे ही न्यायालयाच्या ताब्यात असताना गहाळ झाली आहेत. त्यामुळे यामागे कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची दाट शक्‍यता असताना, पोलिसांनी चिखलीकरलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले, हे मात्र पोलिसी कारभाराचा अजब नमुनाच. 

Web Title: Documents disappear from the court; Offense only against Chikhlikar