मोकाट कुत्र्यांनी तोडले दोन बालकांचे लचके

dog
dog

जळगाव - आईसोबत श्री स्वामी समर्थांच्या बैठकीला जात असताना रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांनी दोन बालकांचे लचके तोडून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी खेडी रस्त्यावरील गोपाळपुरा भागात हरिहर पार्कजवळ घडली. जखमी बालकांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

खेडी रस्त्यावरील गोपाळपुरा येथे कविता बागळे या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. आज सकाळी श्री स्वामी समर्थांच्या बैठकीला त्या मुलगा लोकेश (वय- ४), मुलगी नेहा (साडेतीन वर्ष), तसेच यश अशा तिघांना सोबत घेऊन रस्त्याने जात असताना अचानक मोकाट कुत्र्याने कविता यांच्या अंगावर झडप घातली. त्यांनी प्रतिकार केल्यानंतर इतर दोन कुत्र्यांनी लोकेश व नेहा हिचे लचके तोडले. यश घाबरून पळून गेल्याने तो कुत्र्यांच्या हल्ल्यापासून बचावला. लोकेश याच्या नाकाचा लचके तोडला गेला असून त्याला मोठी जखम झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांनी बकरीचे लचके तोडल्याच्या घटना घडल्या असून, मोकाट कुत्र्यांचा प्रचंड उपद्रव या भागात आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी दोघा बालकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com