तिसरीच्या विद्यार्थ्याचे  डोळे फोडण्याचा प्रयत्न 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

तिसरीच्या विद्यार्थ्याचे 
डोळे फोडण्याचा प्रयत्न 

जळगाव ः तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोळ्यात काड्या खोचून ते फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा भीषण प्रकार आज दुपारी डांभुर्णी (ता. यावल) येथे जिल्हा परिषद शाळेबाहेर उघडकीस आला. हे कृत्य केल्याच्या संशयावरून 19 वर्षीय युवकाला संतप्त जमावाने मारहाण केली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

तिसरीच्या विद्यार्थ्याचे 
डोळे फोडण्याचा प्रयत्न 

जळगाव ः तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोळ्यात काड्या खोचून ते फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा भीषण प्रकार आज दुपारी डांभुर्णी (ता. यावल) येथे जिल्हा परिषद शाळेबाहेर उघडकीस आला. हे कृत्य केल्याच्या संशयावरून 19 वर्षीय युवकाला संतप्त जमावाने मारहाण केली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

जखमी विद्यार्थ्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, संशयित युवकाला ग्रामीण रुग्णालयात हलविले आहे. या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. 
डांभुर्णी येथील रूपेश जयराम कोळी (वय नऊ) हा आज नेहमीप्रमाणे जि. प. शाळेत आला. दुपारी पेपर संपल्यानंतर तो दुपारी दीडला मधल्या सुटीत शाळेबाहेर गेला, पण परत आला नाही. तो शाळेच्या मागील बाजूस रक्तबंबाळ डोळ्यांसह बेशुद्धावस्थेत आढळून आला. काही विद्यार्थ्यांनी ही माहिती मुख्याध्यापिका ऊर्मिला ठाकूर यांना दिली. मुख्याध्यापिका व शिक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली असता काही तरुणांनी जखमी रुपेशला गावातील खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथे त्याच्या आईस बोलावून रुपेशला पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. 

रुपेशला जखमी केल्याचा संशय गावातीलच एका तरुणावर असून, काही जणांनी त्यास रूपेशशी भांडताना पाहिल्याचे सांगितले. तेव्हा त्या संशयिताला नागरिकांनी गावातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पकडून पोलिस हवालदार सुनील तायडे व विकास सोनवणे यांच्या ताब्यात दिले. तेथून त्यास यावल पोलिस ठाण्यात नेण्यासाठी पोलिसांनी डांभुर्णी सरपंच पुरुजीत चौधरी यांचे वाहन बोलावले. 

संतप्त जमावाचा हल्ला 
संशयिताला यावलला नेत असल्याचे पाहून ग्रामपंचायतीजवळ जमलेल्या संतप्त जमावाने संशयिताला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत गाडीवरच हल्ला करून काचा फोडल्या. तसेच पोलिसांना व संशयिताला धक्काबुक्की झाली. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक डी. के. परदेशी पथकासह दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. 

दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांनी यावलला भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. पोलिस ठाण्यात मुख्याध्यापिका ऊर्मिला प्रमोद ठाकूर, गटशिक्षणाधिकारी एजाज शेख, शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र सपकाळे थांबून आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हेड कॉन्स्टेबल सुनील तायडे व विकास सोनवणे यांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेल्या काड्या, दारूच्या बाटल्या, पेन व ठिबक नळी जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी रूपेशवर जिल्हा रुग्णालयात डॉ. अभिषेक ठाकूर व वैद्यकीय अधिकारी किरण पाटील यांनी प्राथमिक उपचार सुरू केले आहेत. 
 

Web Title: dole