दोन दिवसांनंतर खुला होणार  नवीन समांतर बजरंग बोगदा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

दोन दिवसांनंतर खुला होणार 
नवीन समांतर बजरंग बोगदा
 
जळगावः महापालिकेने रेल्वे प्रशासनाच्या सहकार्यातून नवीन तयार केलेल्या समांतर बजरंग बोगद्यात "आउटेलट' न काढल्याने पाणी साचून तलावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सोमवारपासून (27 ऑगस्ट) सुरवात झाली. आज सिमेंटचे पाइप टाकून नाल्यापर्यंत जोडणी करून पाण्याचा निचरा करण्यात आला; तर बोगद्यातील गाळ काढून येत्या दोन दिवसांत नागरिकांसाठी बोगदा खुला केला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली. 

जुन्या बजरंग बोगद्याची अवस्था वाईट, त्यात बोगदा लहान असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. यासाठी महापालिका प्रशासनाने तीन कोटी 75 लाख रुपये खर्चून रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने नवीन समांतर बोगद्याचे काम केले; परंतु पाण्याचा निचरा करण्यासाठी "आउटेलट' न काढल्याने बोगद्यात पावसाचे पाणी साचून तलावसदृश स्थिती निर्माण झाली. महापालिका व रेल्वे प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात होता. त्यानुसार तातडीने रेल्वे प्रशासन व महापालिकेने सोमवारपासून (27 ऑगस्ट) बोगद्यातील पाण्याचा निचरा करण्यासाठीचे काम सुरू केले. बोगद्यात पाइप टाकून मुक्ताईनगरकडून येणाऱ्या नाल्यात हे "आउटलेट' काढण्याचे काम आयुक्तांच्या सूचनेनुसार सुरू झाले. आज हे काम पूर्ण होऊन पाण्याचा निचरा करण्यात आला. 

गाळ काढल्यानंतर बोगदा खुला 
बोगद्यात पावसाचे पाणी गेल्या महिनाभरापासून साचलेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. बोगद्यात आज "आउटलेट' काढून पाण्याचा निचरा करण्यात आला. उद्यापासून (29 ऑगस्ट) महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने बोगद्यातील साचलेला गाळ काढण्याची सूचना आरोग्याधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिली. दोन दिवसांत गाळ काढून बोगदा नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. 

पिंप्राळा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत 
"आउटलेट' काढण्यासाठी बोगद्यातून पाइप टाकून मुक्ताईनगरकडून येणाऱ्या नाल्यात पाणी सोडण्यात आले. यासाठी पिंप्राळा रस्ता खोदण्यात आला. त्यामुळे हा रस्ता बंद झाल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. आज दुपारी खोदलेला रस्ता बुजवून "आउटलेट'चे काम पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. 

ठेकेदाराला "ब्लॅक लिस्ट'मध्ये टाका 
समांतर बजरंग बोगद्याचे पावणेचार कोटी रुपये खर्चूनही नागरिकांची सुविधा न होता असुविधा झाली आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला "ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकावे. त्याच्याकडून खर्चदेखील वसूल करावा, अशी मागणी माजी नगरसेवक मनोहर पाटील यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. 
 
Web Title: don