Nandurbar News : शहाद्यात होळीची पोळी दान करा उपक्रम

Holi Festival 2023
Holi Festival 2023 eSakal

शहादा (जि. नंदुरबार) : शहरातील एनआरआय व्हिलाज वसाहतीत होळीनिमित्त होळीची पोळी दान करा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे सामाजिक क्षेत्रात स्वागत व कौतुक करण्यात येत आहे. (Donate puran poli in Holi festival Initiative Activities will be implemented shahada nandurbar news)

शहादा शहरातील एनआरआय व्हिलाज येथे दर वर्षी मोठ्या उत्साहात होळीचा उतसव साजरा केला जातो. होळीनिमित्त जळणाऱ्या होळी मातेत नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे. यात नैवेद्याच्या रूपाने होळीत पुरणपोळी व अन्न अर्पण केले जाते.

या पार्श्वभूमीवर सामाजिक भान जपून पुरणपोळी व इतर अन्न दार्थ जळणाऱ्या होळीत अर्पण न करता गरजू व गरिबांना देण्याची कल्पना कार्यकर्त्या सुवर्णा जगताप यांनी वसाहतीतील रहिवासी महिलांपुढे मांडली.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Holi Festival 2023
Nashik News : आईला करावी लागली मुलीची प्रसूती; दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाचा प्रस्ताव

वसाहतीतील महिलांनी या कल्पनेचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले व व्यापक स्वरूपात हा उपक्रम एनआरआय व्हिलाजमध्ये राबविण्यात आला. होळीच्या दिवशी होळीमध्ये नैवेद्य अर्पण करण्याऐवजी पुरणपोळी, खीर, वरणभात, भाजी, पोळी संकलित करण्यात आले होते व नैवेद्याबरोबरच मिठाई, बिस्किट, फरसाण असा खूप सारा खाऊ गरिबांमध्ये वाटला गेला होता.

या वर्षीदेखील होळीनिमित्त होळीची पोळी दान करा हा उपक्रम एनआरआय व्हिलाजमध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती सुवर्णा जगताप, लता चौधरी, आशा पाटील, सविता पाटील, सुनंदा पाटील, स्नेहलता पाटील यांनी दिली.

होळीमध्ये टाकून वाया जाणारे अन्न गरिबांच्या पोटात जात असल्याने हा उपक्रम राबविताना खूप समाधान मिळते अशा भावना आयोजकांकडून व्यक्त करण्यात आल्या. या वर्षी होळीच्या दिवशी अन्न संकलित करून गरिबांमध्ये वाटण्यात येणार आहे. इतर नागरी वसाहतींमध्येही अशा स्वरूपाचा सामाजिक उपक्रम राबविला जावा, अशी अपेक्षा येथील महिलांनी व्यक्त केली.

Holi Festival 2023
Satyajeet Tambe | जुन्या पेन्शन साठी आग्रही : सत्यजित तांबे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com