अल्पबचत प्रतिनिधींची टपाल खात्याकडून "विकेट'

दत्ता जाधव
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

जुन्या नोटा स्वीकारणार नसल्याचे जाहीर
नाशिक - अल्पबचत प्रतिनिधींकडून मंगळवारपर्यंत (ता. 22) हजार व पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारणाऱ्या टपाल खात्याने आज अचानक पवित्रा बदलत गुरुवारपासून (ता.24) या नोटा स्वीकारणार नसल्याचे जाहीर केल्याने टपाल खात्याच्या अल्पबचत प्रतिनिधींचे धाबे दणाणले आहेत. बचत गोळा करताना प्रतिनिधींना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

जुन्या नोटा स्वीकारणार नसल्याचे जाहीर
नाशिक - अल्पबचत प्रतिनिधींकडून मंगळवारपर्यंत (ता. 22) हजार व पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारणाऱ्या टपाल खात्याने आज अचानक पवित्रा बदलत गुरुवारपासून (ता.24) या नोटा स्वीकारणार नसल्याचे जाहीर केल्याने टपाल खात्याच्या अल्पबचत प्रतिनिधींचे धाबे दणाणले आहेत. बचत गोळा करताना प्रतिनिधींना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून हजार अन्‌ पाचशेच्या नोटा बाद केल्याचे जाहीर केले, तेव्हापासून जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बॅंकांसह टपाल कार्यालयांसमोर मोठमोठ्या रांगा लागत आहेत. या काळात शहरातील मुख्य टपाल कार्यालयासह विविध 32 उपटपाल कार्यालयांमधून काही कोटी रुपये बदलून देण्यात आले.

टपाल कार्यालयातील अल्पबचत वसुलीच्या व्यवहारावर अल्पबचत प्रतिनिधींना चार टक्के कमिशनही दिले जाते. या प्रतिनिधींद्वारे रोज लाखो रुपयांचा भरणा शहरातील मुख्य टपाल कार्यालयासह अन्य ठिकाणी केला जातो. या प्रतिनिधींना जुन्या नोटा डिसेंबरपर्यंत भरता येतील, असे परिपत्रक सुरवातीला काढण्यात आले होते. त्यानंतर जुन्या नोटा भरण्याची मुदत कमी करण्यात आली. त्यामुळे कालपर्यंत अल्पबचत प्रतिनिधी निश्‍चिंत होते. परंतु, आज सकाळी अचानक परिपत्रक काढून हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा केवळ आजपर्यंतच स्वीकारण्यात येतील, असे अल्पबचत प्रतिनिधींना सांगण्यात आले. नोव्हेंबरचे अद्यापही सहा ते सात दिवस शिल्लक असताना टपाल खात्याने अचानक धोरण बदलल्याने अल्पबचत प्रतिनिधींचे धाबे दणाणले आहेत. शहरातील मुख्य व उपटपाल कार्यालयांत जवळपास अडीच ते तीन हजार अल्पबचत प्रतिनिधी कार्यरत असून, त्यातील अनेकांची नोटांच्या टंचाईमुळे अद्याप संपूर्ण वसुलीही झालेली नाही. कार्यालयातील अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी नियमावर बोट ठेवत केंद्राच्या परिपत्रकानंतरच उद्याचे धोरण ठरेल, त्यामुळे याबाबत आज काहीही सांगू शकत नाही, अशी भूमिका घेतली.

Web Title: don't receive old currency by post department