"साम संजीवनी'मध्ये आज डॉ. हेमंत चौधरी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

नाशिक - साम मराठी वाहिनीवरून आज (ता. 17) दुपारी साडेचारला प्रसारित होणारा आरोग्यविषयक कार्यक्रम "साम संजीवनी'मध्ये येथील मर्क्‍युरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. हेमंत चौधरी सहभागी होतील. "खुब्याचे व गुडघ्याचे विकार' या विषयावर ते मार्गदर्शन करतील. संधिवात, खुबा व मणक्‍याचे आजार कशामुळे उद्‌भवतात? Osteoporises म्हणजे काय? व तो कशामुळे होतो? आपल्या रोजच्या जीवनशैलीत ताणतणावाचा (Stress) हाडांवर काय परिणाम होतो?, आजकाल खूप लोक कार्यालयात बैठेकाम करतात. त्यामुळे संगणकासमोर बसून मणक्‍याचे विकार, मान व पाठदुखीला सामोरे जावे लागते.

नाशिक - साम मराठी वाहिनीवरून आज (ता. 17) दुपारी साडेचारला प्रसारित होणारा आरोग्यविषयक कार्यक्रम "साम संजीवनी'मध्ये येथील मर्क्‍युरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. हेमंत चौधरी सहभागी होतील. "खुब्याचे व गुडघ्याचे विकार' या विषयावर ते मार्गदर्शन करतील. संधिवात, खुबा व मणक्‍याचे आजार कशामुळे उद्‌भवतात? Osteoporises म्हणजे काय? व तो कशामुळे होतो? आपल्या रोजच्या जीवनशैलीत ताणतणावाचा (Stress) हाडांवर काय परिणाम होतो?, आजकाल खूप लोक कार्यालयात बैठेकाम करतात. त्यामुळे संगणकासमोर बसून मणक्‍याचे विकार, मान व पाठदुखीला सामोरे जावे लागते. ते टाळण्यासाठी तुम्ही काय करावे?, मणक्‍याचे, मानेचे व पाठदुखीचे विकार झाले, तर त्यावर काय उपाय आहेत?, पाठदुखी व मणक्‍याचे विकार असल्यास शस्त्रक्रिया करणे योग्य की अयोग्य?, खुब्याचे आजार कशामुळे होतात व ते कोणत्या प्रकारचे आहेत, खुब्याची शस्त्रक्रिया (Hip Replacement) कितपत यशस्वी आहे? व ती कशी केली जाते?, खुब्याच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण पूर्णपणे बरा होतो का? याविषयी डॉ. चौधरी माहिती सांगतील. हा कार्यक्रम प्रसारित होत असताना प्रेक्षक डॉ. चौधरी यांच्याशी थेट संवाद साधू शकतील. प्रश्‍न विचारून शंका-समाधान करून घेण्यासाठी 022- 66843333 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: Dr. Hemant Chaudhary