डॉ. प्रकाश आमटे यांना आरोग्य विद्यापीठाची डी. लिट. 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

नाशिक - ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे डॉक्‍टर ऑफ लिटरेचर (डी. लिट.) ही सन्मान्य पदवी प्रदान करण्याचा ठराव सोमवारी अधिसभेच्या बैठकीत संमत केला. विद्यापीठाचे प्रतिकुलपती व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सुचविल्याप्रमाणे डॉ. प्रकाश आमटे यांना ही पदवी देण्याबाबतचा प्रस्ताव कुलपती कार्यालय व व्यवस्थापन परिषदेने संमत केल्यानंतर अधिसभेत सादर केला, अशी माहिती कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची तिसरी अधिसभा आज विद्यापीठ मुख्यालयात झाली. या वेळी कुलगुरू म्हैसेकर म्हणाले, की डॉ. प्रकाश आमटे यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे यांचादेखील सत्कार केला जाईल. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा या दुर्गम भागात आमटे दांपत्याने आदिवासी गरजूंच्या सेवेचा वसा जपला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DR. Prakash Amte awarded D. Litt. degree of Health University