नाशिक: भाजपतर्फे डॉ. प्रशांत पाटील यांचा अर्ज दाखल

विनोद बेदरकर
सोमवार, 16 जानेवारी 2017

मतदारसंघातील 32 हजार बोगस मते रद्द झाल्याने डॉ. पाटील यांचा विजय निश्‍चित असल्याचा दावा करत तावडे यांनी माजी आमदार प्रतापदादा सोनवणे यांची डॉ. पाटील जागा राखतील, असाही विश्‍वास व्यक्त केला.

नाशिक - विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आज (सोमवार) भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्यासह पक्षाचे आमदार-खासदार उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पक्षाच्या समर्थकांशी शिखरेवाडीच्या मैदानावर नेत्यांनी संवाद साधला आहे.

मतदारसंघातील 32 हजार बोगस मते रद्द झाल्याने डॉ. पाटील यांचा विजय निश्‍चित असल्याचा दावा करत तावडे यांनी माजी आमदार प्रतापदादा सोनवणे यांची डॉ. पाटील जागा राखतील, असाही विश्‍वास व्यक्त केला. तसेच राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असल्याने डॉ. पाटील यांच्या विजयामध्ये अडचण येणार नसल्याचे डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: Dr. Prashant Patil files nomination in Nashik graduates’ constituency