जागतिक वैद्यकीय संघटनेच्या कोषाध्यक्षपदी डॉ. रवी वानखेडकर 

Ravi Wankhedkar
Ravi Wankhedkar

धुळे : "आयएमए'चे येथील माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांची जागतिक वैद्यकीय संघटनेच्या (डब्ल्यूएमए) कोशाध्यक्षपदी प्रशंसनीय निवड झाली आहे. त्यांच्या निवडीने भारताला प्रथमच प्रतिनिधित्व आणि बहुमान मिळाला आहे. 

चिली देशातील सॅनटीएगो शहरात "डब्ल्यूएमए'ने डॉ. वानखेडकर यांची कोशाध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर केली. ती दोन वर्षांसाठी असेल. त्यांच्यामुळे देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर धुळ्याचा लौकिक उंचावला आहे. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. वानखेडकर हे 2018 मध्ये "आयएमए'च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांची ही यशस्वी कारकीर्द पाहून गेल्या वर्षी त्यांची सार्क वैद्यकीय संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर आता त्यांनी "डब्ल्यूएमए'पर्यंत मजल मारली आहे. 

"डब्ल्यूएमए' अर्थात जागतिक वैद्यकीय संघटनेची 1947 मध्ये स्थापन झाली. त्यात 113 देशांचा सहभाग आहे. संघटनेचे मुख्यालय जीनिव्हा येथे आहे. विविध जागतिक आरोग्य समस्यांवर ही संघटना काम करते. डॉ. वानखेडकर कोलेरेक्‍टल सर्जन असून श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात प्रोफेसर ऑफ सर्जरी या वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यांनी नुकतेच कोलोरेक्‍टल सर्जरीसाठी लेझर युनिट सुरू केले आहे. आईचा आशीर्वाद, पत्नी डॉ. मीना, सुपुत्र डॉ. हर्शद, स्नूषा डॉ. प्रभा यांची खंबीर साथ असल्याने वाटचालीचा आलेख उंचावत असल्याचे डॉ. वानखेडकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com