डॉ. वर्षा लहाडेंच्या पोलिस कोठडीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

नाशिक - बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी डॉ. वर्षा लहाडे यांच्या पोलिस कोठडीची मुदत न्यायालयाने आणखी दोन दिवस वाढविली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने डॉ. लहाडे यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.

नाशिक - बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी डॉ. वर्षा लहाडे यांच्या पोलिस कोठडीची मुदत न्यायालयाने आणखी दोन दिवस वाढविली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने डॉ. लहाडे यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.

डॉ. लहाडे यांच्या रुग्णालयाची व त्यात सापडलेल्या कागदपत्रांची तपासणी करणे, अन्य साक्षीदारांचे जबाब, गर्भपातासंबंधीही माहिती घेण्याचे बाकी असून, काही दस्तावेज व यंत्र जप्त करावयाचे असल्याने कोठडीची मुदत वाढवून मागण्यात आली. न्यायाधीश आरती शिंदे यांच्यासमोर त्यांना हजर करण्यात आले. न्यायालयाने तपासासाठी पोलिस कोठडीत आणखी दोन दिवस वाढ केली.

Web Title: dr. varsha lahade police custody