Janjati Gaurav Din: नंदुरबारात घडणार आदिवासी जीवन-संस्कृतीचे दर्शन : डॉ. विजयकुमार गावित

While giving information in the press conference, Tribal Development Minister Dr. Vijayakumar Village. Neighbor Dr. Supriya Gavit, MP Dr. Heena Gavit, Dr. Vikrant More.
While giving information in the press conference, Tribal Development Minister Dr. Vijayakumar Village. Neighbor Dr. Supriya Gavit, MP Dr. Heena Gavit, Dr. Vikrant More.esakal
Updated on

नंदुरबार : ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेत आदिवासी समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी लढा देणारे आदिवासी समाजाचे आद्य क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शासनाने १५ नोव्हेंबर हा दिवस जनजाती गौरव दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे.

त्यानिमित्ताने आदिवासी जीवन व संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने जनजाती गौरव दिनानिमित्त आदिवासी जीवन-संस्कृती महोत्सवासाठी नंदुरबार जिल्ह्याची निवड केली आहे. (Dr Vijayakumar gavit statement Janjati Gaurav Din Darshan of tribal life culture will take place in Nandurbara)

राज्यातील ८८७ कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून १५ ते १७ असे तीन दिवस या महोत्सावातून संस्कृतीचे दर्शन घडविणार आहेत.

या कार्यक्रमाचे उद्‍घाटन १५ नोव्हेंबरला राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होईल. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.

मंत्री डॉ. गावित म्हणाले, की शासनाने मागील वर्षी नाशिक जिल्ह्याची निवड महोत्सवासाठी केली होती. या वर्षी नंदुरबार जिल्ह्याची निवड करून नंदुरबारकरांना मानाची संधी दिली आहे.

१५ ते १७ अशा तीनदिवसीय महोत्सावात राज्यातील ३२ कलापथके व ८८७ कलाकार सहभागी होणार आहेत. १५ नोव्हेंबरला सकाळी अकराला राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते जिल्हा क्रीडासंकुलात उद्‍घाटन होईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नंदुरबारचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्‍घाटनापूर्वी प्रथम आदिवासी संस्कृतीवर आधारित चित्रफीत दाखविली जाणार आहे.

तिन्ही दिवस चित्रफितीच्या माध्यमातून माहिती व जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र तीन व्हॅन कार्यान्वित आहेत. उद्‍घाटनापूर्वी शहरातून विविध राज्यांतील पथकांच्या मिरवणुकीतून त्यांचे कौशल्य प्रदर्शन केले जाईल.

या कार्यक्रमासाठी सुमारे १५ हजारांवर नागरिकांची उपस्थिती राहील. त्यासाठी त्यांच्या निवासासह जेवणाची व्यवस्थाही केली जाणार आहे. त्यासाठीचे नियोजन आदिवासी विकास विभागाकडे सोपविले आहे.

तीन दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, युवा नेते डॉ. विक्रांत मोरे आदी उपस्थित होते.

While giving information in the press conference, Tribal Development Minister Dr. Vijayakumar Village. Neighbor Dr. Supriya Gavit, MP Dr. Heena Gavit, Dr. Vikrant More.
Dhule News: प्रदूषणमुक्त दिवाळीची ‘ऐशीतैशी’! महापालिकेतर्फे शहरात स्वच्छता मोहीम

राज्यपालांचा दौरा

राज्यपाल रमेश बैस १५ नोव्हेंबरला सकाळी दहाला राजभवनातून नंदुरबारकडे हेलिकॉप्टरने प्रयाण करतील.

अकरा वाजून ३५ मिनिटांनी नंदुरबार येथे पोलिस क्रीडा कवायत मैदान येथे आगमन व राखीव, ११.४० ला शासकीय वाहनाने क्रीडासंकुलाकडे प्रयाण, ११.५० ला क्रीडासंकुलात आगमन व राखीव, १२ ते १.३० पर्यंत जनजाती गौरव दिन कार्यक्रमाला उपस्थिती, तेथून सर्किट हाउसकडे प्रयाण, १.४० ते २.४० सर्किट हाउस येथे भोजन व राखीव, २.५५ ला हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.

मुख्यमंत्र्यांचा दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही राज्यपालांसमवेत नंदुरबार दौऱ्यावर असणार आहेत. मात्र ते एक वाजून ५० मिनिटांनी कार्यक्रम आटोपल्यावर हेलिपॅडवर आगमन होईल. तेथून हेलिकॉप्टरने राजभवन येथे आगमन व तेथून मोटारीने तीन वाजून ४५ मिनिटांनी वर्षा बंगल्यावर आगमन व राखीव.

While giving information in the press conference, Tribal Development Minister Dr. Vijayakumar Village. Neighbor Dr. Supriya Gavit, MP Dr. Heena Gavit, Dr. Vikrant More.
Dhule News: धुळे महानगर भाजयुमो राज्यात प्रथम! सेवा पंधरवड्यात उत्कृष्ट कामगिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com