Nandurbar News : 2 लाख तरुणांना मिळणार शासकीय नोकरी : डॉ. विजयकुमार गावित | Dr Vijayakumar Village statement about govt job for youth nandurbar news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nandurbar News : 2 लाख तरुणांना मिळणार  शासकीय नोकरी : डॉ. विजयकुमार गावित

Nandurbar News : 2 लाख तरुणांना मिळणार शासकीय नोकरी : डॉ. विजयकुमार गावित

Nandurbar News : देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात शासन ७५ हजार तरुणांना शासकीय नोकरीत संधी उपलब्ध करून देणार होते, आता ही संधी सुमारे दोन लाख तरुणांना उपलब्ध करून देणार असून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन आता आपल्या दारी आले आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. (Dr Vijayakumar Village statement about govt job for youth nandurbar news

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांच्यातर्फे ‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेंतंर्गत समुपदेशन व रोजगार मेळावा नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे घेण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर. एस. मानकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य योगेश पाटील, ऋषिका गावित, गिरीश बडगुजर, प्रा. रविकिरण पाटकरी, एस. बी. जाधव, नीलेश गायकवाड, गोपाळ महाजन, प्रमोद महाले, रणजित गवांदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नोकरी देणारे उद्योजक व्हावे

पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, ज्यांना नोकरीत संधी उपलब्ध होणार नाहीत त्यांनी नाराज न होता शासनाच्या अशा समुपदेशन मेळाव्यातून मार्गदर्शन घ्यावे. केवळ येथे रोजगाराच्या, शिक्षणाच्या संधींवरच मार्गदर्शन करून शासन थांबणार नाही तर, ज्यांच्या हातात कुशलता आहे, अशांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन शंभर टक्के रोजगार दिला जाणार आहे.

केवळ नोकरीच्या भरवशावर न राहता आता तरूणांनी नोकरी देणारे उद्योजक म्हणून पुढे यायला हवे. त्यासाठी शिक्षण, प्रशिक्षणापासून थेट व्यवसाय, उद्योग उभारण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सवलती व अर्थसहाय्याच्या योजना शासनाने सुरू केल्या आहेत, त्याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा असे आवाहन पालकमंत्री डॉ. गावित यांनी केले आहे.