धुळ्याचे डॉ. वाघ जगातील अव्वल डॉक्‍टरांमध्ये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

जागतिक सेमिनार स्पर्धेत प्रथम; स्वादुपिंडातील खडे काढण्याचे नवे तंत्र विकसित

कापडणे - धुळे येथील डॉ. अमोल नानासाहेब वाघ यांनी जगातील अव्वल डॉक्‍टरांमध्ये आपले स्थान पटकाविले आहे. मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील सहा डॉक्‍टरांच्या पथकाला सलग दुसऱ्या वर्षी जागतिक शस्रक्रिया सेमिनार वजा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. या पथकात डॉ. अमोल वाघ यांची संशोधन शस्रक्रिया विशेष उल्लेखनीय ठरली आहे. दरम्यान, हे पथक नंदुरबार येथे नुकत्याच झालेल्या महाआरोग्य शिबिरातही सहभागी झाले होते.

अमेरिकेतील सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोटेस्टिनल ॲण्ड एन्डोस्कोपिक सर्जन (सेजेस) ही संस्था दर वर्षी ही स्पर्धा घेते. जगभरातील दीडशे देशांतील डॉक्‍टर त्यात भाग घेतात. एप्रिलमध्ये मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमधील सहा डॉक्‍टरांच्या पथकाने स्वादुपिंडातील खडे काढण्याच्या शस्त्रक्रियेत दुर्बीण स्टेपलरचा वापर केला अन्‌ अवघड शस्रक्रिया सोपी असल्याचे जगाला दाखवून दिले. यासाठी त्यांनी सहा व्हीडीओ व नऊ पेपर्स अमेरिकेत सादर केले. जगातील नामवंत डॉक्‍टर या तंत्राने प्रभावित झाले. या पथकाला दोन हजार डॉलरचे पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. 

गेल्या वर्षी श्वासपटलावरील छिद्रावरील अवघड शस्त्रक्रियेला डॉक्‍टरांच्या या पथकाला प्रथम पारितोषिक मिळाले होते. या पथकाचे प्रमुख डॉ. भंडारवार होते. त्यात डॉ. अमोल वाघ, डॉ. सौरभ गांधी, डॉ. चिंतन पटेल व डॉ. प्रवीण तुंगुरवार यांचा समावेश आहे. 

जगात भारतातील डॉक्‍टर अव्वल आहेत. देशात संशोधनासाठी संधी उपलब्ध आहे. विद्वत्ता, चातुर्य आणि साहस यांच्या जोरावर डॉक्‍टर यशस्वी होतात. मराठी माणूस कोठेही मागे नसल्याचे ठळकपण जाणवते.
- डॉ. अमोल नानासाहेब वाघ, मुंबई

Web Title: dr. wagh involve in global topper doctors