'आमच्या अंगावरून बैलगाडी घेऊन जा, आम्ही रस्ता देणार नाही'

दीपक कच्छवा
बुधवार, 9 मे 2018

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : 'आमच्या अंगावरून बैलगाडी घेऊन जा, मात्र आम्ही रस्ता देणार नाही' असे म्हणत सायगाव (ता.चाळीसगाव) येथे वहीवाटेच्या कारणावरून शासकीय कामात अडथळा आणल्याने तिघांच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : 'आमच्या अंगावरून बैलगाडी घेऊन जा, मात्र आम्ही रस्ता देणार नाही' असे म्हणत सायगाव (ता.चाळीसगाव) येथे वहीवाटेच्या कारणावरून शासकीय कामात अडथळा आणल्याने तिघांच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी सांगितले की, सायगाव (ता.चाळीसगाव) येथे आज सकाळी अकराला मंडळधिकारी सुधीर बच्छाव व तलाठी गणेश लोखंडे हे तहसिलदारंकडील मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 कलम 21 मधील तरतुदीनुसार अमलबजावणी करणेसाठी गेले होते. गट क्रमांक  38' ब' च्या वहीवाट  संदर्भात हंसराज पाटील यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी ते शेतात बैलगाडी घेऊन हजर होते. हा रस्ता मोकळा करण्यासाठी मंडळधिकारी बच्छाव, व तलाठी लोखंडे यांच्यासह मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अनिल देशमुख, गोरक चकोर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे महिला पोलिस मयुरी पाटील उपस्थितीत होत्या. या सर्वांनी शेतातून बैलगाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता रस्त्यावर शिवाजी सोनवणे, संभाजी सोनवणे, रावसाहेब सोनवणे हे बसुन होते. या तिघांना मंडळधिकारी बच्छाव यांनी तहसीलदार यांचे आदेश असुन तुम्ही रसत्यावरून बाजुला व्हा अन्यथा कायदेशीर कारवाई करू असे सांगितले.

मात्र तरीही तिघे बाजुला झाले नाहीत. उलट आमच्या अंगावरून बैलगाडी घेऊन आम्ही रस्ता देणार नाही यावर ठाम राहीले. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याने शिवाजी सोनवणे, संभाजी सोनवणे, रावसाहेब सोनवणे, या तिघांच्या विरोधात मंडळधिकारी सुधीर बच्छाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: drive bullock cart from our body we cant give way