दुष्काळासाठी सगळ्यांचे लक्ष पुण्याच्या होणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

नांदगाव - सत्यमापनाच्या कारवाईनंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणनंतर पन्नास टक्क्या पेक्षा जास्त नुकसान झालेल्या तालुक्यातील दुष्काळ जाहीर होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बुधवारी पुणे येथे होणाऱ्या राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकी नंतरचा दुष्काळ जाहीर होण्याचा सोपस्कर पूर्ण होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

नांदगाव - सत्यमापनाच्या कारवाईनंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणनंतर पन्नास टक्क्या पेक्षा जास्त नुकसान झालेल्या तालुक्यातील दुष्काळ जाहीर होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बुधवारी पुणे येथे होणाऱ्या राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकी नंतरचा दुष्काळ जाहीर होण्याचा सोपस्कर पूर्ण होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

खरिपाच्या दुष्काळातील दुसऱ्या टप्प्यातील तालुक्यांची यादी जाहीर करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील तालुकानिहाय घेतलेल्या सत्यमापनाची माहिती संकलित झाली होती. या माहितीच्या आधारे व सत्यमापनाच्या अँटी सर्वेक्षण करण्यात आलेले सर्वेक्षणाचे /प्रयोगाचे भारांकित सरासरीच्या आधारे पिंकांच्या नुकसानीचे संकलन नुकतेच करण्यात आले होते. ३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसान आढळ्यास दुष्काळ नाही. तर ३३ ते ५० टक्के नुकसान आढळल्यास माध्यम दुष्काळ तर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आढळल्यास गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असे निकष लावण्यात आले होते. त्यानुसार नांदगाव, मालेगाव व बागलाण या तीन तालुक्यात पिकांच्या नुकसानीचा आकडा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आल्याने या तिघा तालुक्यात गंभीर दुष्काळाचीस्थिती असल्याचं निष्कर्ष काढण्यात आला आहे. राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांची पुणे येथे कृषी आयुक्तांच्या कार्यालयात बुधवारी २४ ऑक्टोबर ला बैठक होत आहे. 

दृष्टिक्षेपातला दुष्काळ 
तालुक्यातील सत्यमापन सर्वेक्षण व पीक कंपनी प्रयोग आकडेवारीनुसर सत्यमानासाठी निवडण्यात आलेल्या हिसवळ, हिरेनगर, क्रांतीनगर वाखारी, मुळ्डोंगरी, कुसूमतेल, गोंडेगाव, पिंप्रीहवेली, अनकवाडे, अस्तगांव या दहा गावातील घेण्यात आलेल्या शंभर प्रयोगापैकी सर्व प्रयोगात पिकांच्या उत्पादनात घेण्यात आलेली सरासरी उप्तादनाच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मका, बाजरी पिकातली घट दिसून आली. 

टँकर अवस्था 
सध्यस्थितीत ४ गावे व २५ वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा तर आठ गावे व तीस वाड्यावस्त्या साठी टँकरची मागणी जानेवारी नंतर त्यात वाढ होऊन पुन्हा ५५ गावे व दोनशे ७० वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार

जलसाठे अवस्था  
तालुक्यातील माणिकपुंज व नाग्यासाक्या माध्यम प्रकल्पासह  आठपैकी अवघ्या दोनच लघु पाट बंधारे प्रकल्पात अवघा १३८.३७ दशलक्षघनफूटी शिल्लक उपयुक्त जलसाठा. पशुधन संख्या ८२ हजार ३१७ त्यासाठी लागणारा प्रतिमाह चाऱ्याची आवश्यकता १२ हजार ७८० मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता. 

Web Title: For the drought, the attention of all the District Collector's representatives in Pune