पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या अडकला शौचालयात

Leopard in Nashik
Leopard in Nashik

लखमापूर : खेडगाव (ता. दिंडोरी) येथे पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या शौचालयात अडकल्यामुळे जेरबंद झाला. सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली.

परशराम लहीतकर व प्रकाश दवंगे बागेत काम करत असताना बागेतून बिबट्या पळताना बघितला. थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांनी त्याचा पाठलाग केला असता बिबट्या किरण शेटे यांच्या कोल्डस्टोअरेजच्या भिंतीवरून उडी मारून कोल्डस्टोअरेजमध्ये घुसला. यानंतर तो कोल्डस्टोअरेजमधील शौचालयामध्ये जाऊन बसला. 

काही वेळात ही वार्ता पसरली. ग्रामस्थ जमा होता असतानाच कोल्डस्टोअरेजचे राखणदार व इतर काही जण बिबट्याचा शोध घेऊ लागले. यातच एकाने कोल्डस्टोअरेजच्या शौचालयाचा दरवाजा उघडून बघितला असता तेथे बिबट्या दिसला. या मजुराने क्षणाचीही उसंत न घेता शौचालयाचा दरवाजा बाहेरून बंद केला. तोपर्यंत अनेक तरुण जमा झाले होते.

भास्कर भगरे व महेश ठुबे यांनी घटनास्थळी येऊन तत्काळ वन अधिकारी वाडेकर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. दीड ते दोन तासांत ते घटनास्थळी पोचले. त्यांनी पुढील यंत्रणेला आदेश देऊन जाळी, भूल देण्याचे इंजेक्‍शन व सर्व साधनसामग्री बोलावून घेतली. त्यांना खेडगाव येथील तरुणांनी मदत केली. त्यांनी शौचालयाच्या दरवाजाला पिंजरा लावून बिबट्याला भूल दिली व ताब्यात घेतले.

याकामी ग्रामपंचायत सदस्य अनिलदादा ठुबे, रमेश काका सोनवणे, कोल्डस्टोअरेजचे मालक किरण शेटे, जितेंद्र ठुबे, दीपक ढोकरे, बाळासाहेब उगले, तरुणांची मदत झाली. वन विभागाचे वाडेकर, गायकवाड, उपायुक्त पशुसंवर्धन नम्रता हिरे, वनपरिमंडळ अधिकारी, वणी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी, पाटील यांनी याकामी लक्ष दिले. खेडगावात दुसऱ्यांदा बिबट्या दिसला. वन विभागाचे कर्मचारी व वणी पोलिसांच्या मदतीने बिबट्याला पकडण्यात यश आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com