दुष्काळी उपाययोजनांसाठी घंटानाद आंदोलन

pune.jpg
pune.jpg

मालेगाव(नाशिक) : निमगाव, सोनज, सौंदाणे जिल्हा परिषद गटात पाऊसच झाला नाही. गेली तीन वर्षे दुष्काळाची तीव्रता गडद झाल्याने शेतकरी, कामगार संकटात सापडला आहे. खरीप-रब्बीचा प्रश्‍नच नाही. पाटावर ठेवायला दाणा नाही. आर्थिक चणचण असतांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पशुधन जगवावे कसे असा प्रश्‍न आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला मात्र उपाययोजना शुन्य आहे. चारा-पाणी,टॅंकरची सुविधा, चारा छावण्या,फेरपीक कर्ज यासह दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मधुकर हिरे यांनी गुरुवारी (ता.२२) येथे दिला.

येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज  हिरे, बाजार समितीचे माजी सभापती बंडुकाका बच्छाव, दीपक अहिरे, सरपंच निंबा हिरे, पंचायत समितीचे माजी सभापती अशोक शेवाळे, माजी सदस्य अरुण शेवाळे आदींच्या नेतृत्वाखाली घंटानाद व लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. बच्छाव यांनी दुष्काळाची भीषणता कथन केली.

रोजगारासाठी शेतकरी, कष्टकऱ्यांना ५० किलोमीटर अंतरावर जावे लागत अाहे. चांदणभर पाऊस झाला नसतांना शिवाराची काय स्थिती असेल याचा गांभीर्याने विचार करावा. अन्यथा ग्रामस्थ कुटुंबासह बिऱ्हाड आंदोलन छेडतील असा इशारा हिरे व बच्छाव यांनी दिला.आंदोलनकर्त्यांनी प्रांताधिकारी अजय मोरे, तहसिलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी अानंद पिंगळे आदींनी आंदोलनस्थळी धाव घेतली. आंदोलनकर्त्यांनी त्यांना निवेदन सादर केले. प्रशासन चारा उपलब्ध करुन देईल. लोकसंख्या व अन्य स्थिती लक्षात घेऊन टॅंकरची संख्या वाढवू असे आश्‍वासन संबंधितांनी दिले.

आंदोलनात घोडेगाव सरपंच पंकज निकम, निंबायती सरपंच दिलीप चौधरी, निमगावचे उपसरपंच दुर्गादास नंदाळे, माजी उपसरपंच अरुण हिरे, महेंद्र पाटील, रामचंद्र पाटील, सोमनाथ शेलार, एकनाथ शेलार, बळीराम हिरे, पप्पू नंदाळे, भगवान शेवाळे, रमेश अहिरे, बळीराम अहिरे, विपुल नंदाळे, रमेश शेवाळे, गोकुळ सोनवणे, सुदाम मान, बापू जगताप, वाळुदास बोडके, गोरख ठोके, चंद्रशेखर शिंदे, दयाराम रसोडा, समाधान दैतकार, सुभाष अहिरे, ललित हिरे, सतीश शेवाळे आदींसह शेकडो शेतकरी व महिला सहभागी झाल्या होत्या.

आंदोलनकर्त्यांच्या मागण्या
- चारा छावण्या सुरु कराव्यात
- जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
- वाडी वस्तीवर शुध्द पाणीपुरवठा करावा.
- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी.
- नव्याने फेरपीक कर्ज द्यावे.
- शेती वीजपंपाचे वीजबील माफ करावे.
- निमगाव गटातील गावांच्या पाणीयोजना विहीर असलेल्या भुईगव्हाण शिवारात एक्सप्रेस फीडर करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com