'सकाळ’च्या वृत्ताची मुख्यमंत्र्यांकडून दखल 

Mehunbare
Mehunbare

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : दै. ‘सकाळ’च्या ८ मेच्या अंकात ‘अक्षय्य तृतीयेलाही घागरी रिकाम्याच’ या मथळ्याखाली परिसरातील पाणीटंचाई संदर्भातील झळकलेल्या वृत्ताची थेट मुख्यमंत्र्यांनीच दखल घेतली आहे. या संदर्भात उपाययोजना करण्याचे त्यांनी आश्वासित केले असून पाणीटंचाई निवारणार्थ आता कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. 

पाणीटंचाईच्या दाहकतेमुळे मेहुणबारे परिसरातील कृष्णापुरी तांडा, अभोणे तांडा, दरा तांडा, विसापूर तांडा, लोंढे तांडा, पिंपळवाडी तांडा, वरखेडे तांडा या बंजारा समाजाची वस्ती असलेल्या तांड्यावर ग्रामस्थांना जगणे कठीण झाले आहे. अक्षय्य तृतीयेसारख्या महत्त्वाच्या सणाला घरोघरी घागरी रिकाम्या ठेवण्याची दुर्दैवी वेळ या भागातील रहिवाशांवर आलेली होती. या संदर्भात ‘सकाळ’मध्ये ‘टंचाईच्या झळा’ या विशेष पानावर ८ मेच्या अंकात वस्तुनिष्ठ वृत्त प्रसिद्ध झाले होते. 

मुख्यमंत्र्यांकडून दखल 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थानावरून ‘ऑडीओ ब्रीज सिस्टम’द्वारे जिल्ह्यातील सरपंचांशी मोबाईलवरून थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधला. दुष्काळावर एकजुटीने मात करू असे आश्वासन देऊन त्यांनी स्वतः या कार्यक्रमात शेवटी स्वतःचा व्हॉट्स ॲप असलेला मोबाईल क्रमांक ८८७९७३४०४५ हा दिला होता. आपल्या तक्रारी सूचना या नंबरवर पाठवा असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले होते. त्यानुसार, ‘सकाळ’चे मेहुणबारे येथील बातमीदार दीपक कच्छवा यांनी ‘सकाळ’मधील वृत्त त्यांना सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी पाठवले. आज सकाळी दहा वाजून नऊ मिनिटांनी श्री. कच्छवा यांच्या व्हॉट्सऍपवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले, की ‘आपल्या व्हॉट्सऍप’ संदेशची दखल घेतली असून लवकरच या संदर्भात दखल घेतली जाईल. 

असे आले मुख्यमंत्र्यांचे उत्तर 
‘नमस्कार ! मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुष्काळ निवारणाविषयी झालेल्या थेट संवाद सत्रानंतर आपला वरील मेसेज प्राप्त झाला असून आपल्याला लवकरात लवकर अपेक्षित उत्तर मिळेल. धन्यवाद !’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com