दारूच्या नशेत एकाची डोक्‍यात दगड घालून हत्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

नाशिक रोड - देवळालीगाव येथील रोकडोबावाडीत राहणाऱ्या बाळू ऊर्फ बाळासाहेब दोंदे (वय 45) यांच्या तीन महिन्यांपूर्वी वास्को चौकाजवळ डोक्‍यात दगड घालून हत्या करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने 7 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

नाशिक रोड - देवळालीगाव येथील रोकडोबावाडीत राहणाऱ्या बाळू ऊर्फ बाळासाहेब दोंदे (वय 45) यांच्या तीन महिन्यांपूर्वी वास्को चौकाजवळ डोक्‍यात दगड घालून हत्या करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने 7 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

नाशिक रोड पोलिस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, निरीक्षक शेलकर यांनी माहिती दिली. 10 मेस दोंदे यांचा खून झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तीन महिन्यांत रात्री टवाळखोर, मद्यपी, गांजा पिणाऱ्या सुमारे 80 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून माहिती घेतली. याचदरम्यान गुन्हे शाखेचे विशाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार खुनातील संशयित आरोपी जेल रोड येथील रहिवासी असल्याचे समजले. पोलिसांच्या पथकाने संशयिताच्या घरावर पाळत ठेवून शैलेश शेटे (24, रा. लोखंडे मळा) आदित्य नागरे (23, रा. जेल रोड) यांना ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता या दोघांनी दोंदे याच्या खुनाची कबुली दिली. 

9 मेस रात्री आठला आम्ही दोघे कॅनॉल रोड येथून दारू पिण्यासाठी सुभाष रोड येथे गेलो. त्या ठिकाणी दारू व अंडाभुर्जी घेऊन साई सहारा लॉजशेजारील बोळामध्ये मद्यपान केले. या वेळी रात्रीचे दोन वाजले होते. तिथून बाहेर आल्यावर आमचा एका अनोळखी व्यक्तीशी किरकोळ कारणावरून वाद झाला. यात आम्ही त्या व्यक्तीस मारहाण केली. घरी जाताना त्या व्यक्तीने आमच्या पाठीमागे येत वीट फेकून मारल्याने आम्हाला राग अनावर झाला. त्यामुळे आम्ही त्याला वास्को चौकात आणून त्याच्या डोक्‍यात सिमेंटचा ब्लॉक टाकून पलायन केले, अशी कबुली संशयितांनी दिली. 

Web Title: Drunken one head shot stone