वाढीव गुण पदरी पाडण्यासाठीच्या प्रस्तावाला मिळाली मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

येवला - कला, संगित, नृत्य, नाट्य या कलांचे विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतीचे वाढीव गुण पदरी पाडून घेण्यासाठी दहावीच्या विध्यार्थ्यांना प्रस्ताव द्यावा लागणार आहे. यासाठी नाशिक विभागीय बोर्डाने दिलेली मुदत आज संपत असल्याने याला मुदतवाढ देण्यात आली आहे.

वाढीव गुणाची विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून सवलत मिळत आहे. मागील वर्षी इंटरमिजीयटसाठी अ ग्रेडला १५, ब ग्रेडला १० व क ग्रेडला ५ गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एका वर्षांतच यात बदल करून आता फक्त ७,५ व ३ गुण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यावर्षी निकाल लागलेला नव्हता तोच मुदत संपत आली आहे.

व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब साळुंके यांना आलेल्या तक्रारींची दखल घेत तातडीने यासंदर्भात मुदतवाढ करण्याची मागणी केली होती. वाढीव कलागुण प्रस्ताव नाशिक विभागीय बोर्डाकडून १५ जानेवारी पर्यंत दाखल करण्यासाठी अंतीम मुदत होती. एलीमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षांचे निकालच अद्याप लागले नसल्याने नेमका प्रस्ताव पाठवायचा कसा? हा प्रश्न मुख्याध्यापक, कलाशिक्षक, पालक, विद्यार्थी यांना पडलेला होता. नाशिक जिल्हा कार्यकारणीने पुढाकार घेउन ही तक्रार संघटनेला पाठवली तात्काळ बोर्डाला लेखी निवेदन व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघाने जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय सांगळे यांना पाठवले. त्यांनी विभागीय संपर्क प्रमुख सचिन पगार, चंद्रकांत सावंत यांना सोबत घेउन बोर्डाचे अध्यक्ष पाटील, सचिव नितीन उपासणी व वाय.पी.निकम यांची भेट घेत समस्या समजावुन दिली. विभागीय प्रमुखांनी कलासंचालनालय मुंबई यांचेशी काल रविवार असुनही फोनवर चर्चा केला. सर्व बाजुने सकारात्मक निर्णय झाला. आणि आज ही प्रस्ताव पाठवण्याची अंतीम मुदत आता २१ जानेवारी पर्यंत वाढवुन मिळाली आहे. व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक संघाने पाठपुरावा केल्याने ही मुदत वाढली आहे.

"चित्रकला परीक्षेचा आजच निकाल लागला असून अद्याप अनेक शाळांना तो मिळालाही नाही. विद्यार्थ्यांचे अतिरिक्त गुनाची संधी वाया जाणार असल्याने प्रस्तावासाठी मुदतवाढ आवश्यक होती. ती आज मंडळाने जाहीर केल्याने विध्यार्थी व शाळांना प्रस्ताव देणे शक्य होणार आहे. 
- दत्तात्रय सांगळे, जिल्हाध्याक्ष, व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघ

Web Title: Due to the extension of offer for posting growth marks