डिझेल दरवाढीमुळे शेतीच्या मशागतीचा खर्च वाढला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

तळवाडे दिगर(जि.नाशिक) : सध्या खरीप हंगामातील पेरणीचे दिवस येऊन ठेपल्याने मशागतीचा कामांना वेग आला आहे. या कामांसाठी मजुरांची गरज भासू लागली आहे. यंदा मजुरीचे दर ५० ते ८० रुपयांनी तर मशागतीसाठी लागणाऱ्या वाहनांचे दर डिझेल दरवाढीमुळे ३०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत.

तळवाडे दिगर(जि.नाशिक) : सध्या खरीप हंगामातील पेरणीचे दिवस येऊन ठेपल्याने मशागतीचा कामांना वेग आला आहे. या कामांसाठी मजुरांची गरज भासू लागली आहे. यंदा मजुरीचे दर ५० ते ८० रुपयांनी तर मशागतीसाठी लागणाऱ्या वाहनांचे दर डिझेल दरवाढीमुळे ३०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत.

पूर्वी शेतीत कामाला जाताना तीन ते चार कि.मी. अंतरापर्यंत मजूर पायी चालत जायचे. आता मात्र शेतकऱ्यांना आपले वाहन घेऊन मजुरांना घेण्यासाठी सकाळीच सगळे काम सोडून त्यांच्या घरी जावे लागत आहे. तर काही शेतकऱ्यांना मजूर मिळावा यासाठी ट्रक्टर, पिकअप व इतर वाहने घेऊन आदिवासी पाडे गाठावे लागत आहेत. इतर खेड्यातूनही मजूर शोधण्यासाठी व त्यांना आपल्या शेतापर्यंत नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधन खर्च अधिक होतो, येथूनच मजूर एकाच वेळा वेगवेगळ्या शेतात पाठविण्यासाठी नियोजन केले जाते.

 इंधन दरवाढीमुळे अत्याधुनिक पद्धतीने शेती मशागत करण्यासाठी मागील वर्षापेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहे. जनावरांना चारा व पाणी टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीस काढून ट्रक्टर व इतर साधनसामग्री शेतीसाठी उपलब्ध करून घेतली, मात्र इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पूर्वी वैयक्तिक व बैलजोडीच्या सहाय्याने शेतीचे कामे करण्याची पद्धत होती. कालांतराने औद्योगिक संस्थांच्या माध्यमातून ही पद्धत बदलत गेली. हल्ली अत्याधुनिक मशिनरी व ट्रक्टरच्या सहाय्याने शेती करण्याची चढाओढ शेतकऱ्यांमध्ये लागली आहे, पण इंधन दरवाढीमुळे अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने शेती करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. नांगरीसाठी प्रती एकर १५०० ते २००० रुपये मोजावे लागत आहेत. तर माल बाजासामिती पर्यंत नेण्याचा खर्च देखील वाढला आहे.

Web Title: due to the hike in cost of farming, the cost of farming has increased