VIDEO : महाराष्ट्रातील रस्त्याची सर्वदूर चाळण कशी.... हे बघा....!

potholes sangamner.jpg
potholes sangamner.jpg

नाशिक : महाराष्ट्रात खड्डेमय रस्ते काही कमी नाही. अंकुचीदार तळे झालेल्या रस्त्यांचे दर्शन सध्या महाराष्ट्रात घडत आहे. विधानसभा निवडणूक झाल्या आणि त्यात गुंतलेले राजकारणी याचा पद्धतशीरपणे फायदा उठवत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या अधिकारयांनी रस्त्याच्या दुरवस्थेकडे कानाडोळा केला आहे. त्यातच सततच्या पावसामुळे रस्ते आणखी उखडले आहेत. त्यामुळे टायर फुटणे, पाटा तुटणे, मानक सैल होणे, पेट्रोलचा खर्च वाढणे अश्या प्रश्नांनी महाराष्ट्राची जनता जर्जर झाली आहे. आज सकाळी (ता .३१) संगमनेर मध्ये भर रस्त्यात थंड पडलेली शिवशाही दुरुस्त करण्याची वेळ चालकावर आली होती . चालकाच्या बाजूचा टायर काढून सुरु असलेली दुरुस्ती रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांच्या दृष्टीने राज्यात काय चालले आहे. या बद्दलची उत्सुकता प्रकर्षाने जाणवली आहे. 

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये उखडलेल्या रस्त्यानं बद्दल पर्वा न करता आनंदोत्सव साजरा करणारे लोकं आता आपापल्या घरी परंतु लागले आहेत. अश्या या नागरिकांना या रस्त्यांनी सतावले आहे. राज्यात एकीकडे सत्ता स्थापण्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना व्यस्थ असल्याने यंत्रणेला घाम फुटणार का असा प्रश्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com