चोरट्यांचा मोर्चा डाळिंबाकडे वळल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट

दीपक खैरनार
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

अंबासन, (ता.बागलाण जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील फोपीर येथील डाळींब उत्पादक शेतकरी पुरुषोत्तम संतोष भामरे यांच्या ताहाराबाद येथील गट क्रमांक १३४/१ मधील शेतातील तयार झालेले डाळिंब अंदाजे चारशे किलो डाळिंबांची चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन चोरी केल्याने चोरट्यांचा मोर्चा डाळिंबाकडे वळवला असल्याने शेतकऱ्यांत घबराट पसरली आहे. 

अंबासन, (ता.बागलाण जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील फोपीर येथील डाळींब उत्पादक शेतकरी पुरुषोत्तम संतोष भामरे यांच्या ताहाराबाद येथील गट क्रमांक १३४/१ मधील शेतातील तयार झालेले डाळिंब अंदाजे चारशे किलो डाळिंबांची चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन चोरी केल्याने चोरट्यांचा मोर्चा डाळिंबाकडे वळवला असल्याने शेतकऱ्यांत घबराट पसरली आहे. 

तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती बघता अनेक शेतकरी टॅकरने शेतीपिकांना पाणी देऊन वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. डाळिंब उत्पादक छाटणीपासून ते डाळिंबाच्या झाडांना आधार देण्यापर्यंत केलेला सर्व खर्च कर्ज काढून करीत आहेत. भामरे यांनी दुष्काळजन्य परिस्थितीत आपल्या विहीरीतील पाण्यावर बाग जोपासली होती. बागेतील डाळींब परिपक्व झाले असून ते विकण्यासाठी व्यापाऱ्यांच्या संपर्कात होते. काही दिवसांत या संपूर्ण डाळींबाची विक्री होणार तोच या बागेतून सुमारे चारशे किलो डाळिंबाची चोरी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. यापूर्वींही अनेक वेळा याच बागेतून डाळिंबाची चोरी झाल्याचे डाळींब उत्पादक शेतकऱ्याने सांगितले.

डाळींब चोरी होत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱयाने शेतीच्या संपूर्ण बाजुला तारेचे कुंपन केले आहे. मात्र चार चोरट्यांनी कुंपण उचकटून डाळिंबाच्या बागेत प्रवेश करीत आठ गोणीत भरले व चार दुचाकीच्या सहाय्याने पहाटेच्या सुमारास नामपुर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशाव्दारावर पोहोचले शेतकरी पुरुषोत्तम भामरे यांनी काही शेतकऱयांच्या मदतीने यांच्यावर नजर ठेऊन होते. बाजार समितीच्या प्रवेशद्वारापाशी चोरटे छबू बंडू आहिरे (रा.ताहाराबाद), कारभारी बापू पवार (रा. जाखोड), राजेंद्र दोधा आहिरे (रा.ताहाराबाद) व मनोहर राजेंद्र आहिरे (रा.ताहाराबाद) हे चौघे पोहचताच शेतकऱयांनी हटकले असता त्यांनी तेथून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. यात छबू आहिरे, कारभारी आहिरे यांना पकडून ठेवले व राजेंद्र आहिरे व मनोहर आहिरे हे साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले.

पहाटे पोलिस उपनिरीक्षक श्रीराम कोळी, हवालदार दिपक भगत, सुनिल पाटिल त्यांना प्रवेशद्वारापाशी गर्दी दिसली विचारपूस केली असता डाळिंबाची चोरी केल्याने शेतकऱ्यांनी पकडून ठेवले होते. पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेतले पुरुषोत्तम भामरे यांनी या चोरट्यांविरोधात जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून चार दुचाकीसह चारशे किलो वजनाचे आठ गोणी असा एकून एक लाख आठ हजार रूपयांचा ऐवज जप्त केले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दिपक भगत, सुनिल पाटिल करीत आहेत.

जप्त केलेली मोटारसायकल क्र.
१) एमएच ४१ एएफ ९६४०,
२) एमएच ४१ वाय ३४२७,
३) एमएच ४१ एएल १८९७ व एमएच ४१ के ३९५० 

शेतकरी अतिशय मेहनत घेऊन डाळींबाचे पिक घेतात. चारशे किलो डाळींब घेऊन चोरटे फरार झाले होते. शेतकऱ्यांनी शिताफीने चोरट्यांना पकडून ताब्यात दिले. फरार झालेले आरोपींचा शोध घेतला जात आहे.
- गणेश गुरव, सहाय्यक पोलिस निरीक्षक जायखेडा

डाळींब तयार झाल्यापासून दरवेळी चोरटे डाळींब चोरी करीत होते. त्यामुळे संपूर्ण क्षेत्राला कंम्पाऊड करून घेतले तरीसुद्धा चोरट्यांनी डाळींब चोरले त्यांचा पाठलाग केला व नामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशाव्दारावर सापडले.
- पुरुषोत्तम भामरे, डाळींब उत्पादक शेतकरी फोपीर

Web Title: Due to the thieves turning the pomegranate, farmers are frustrated