Unseasonal Rain : अवकाळीच्या अंदाजाने कांदा काढणीस वेग

A school girl helping her parents harvest onions.
A school girl helping her parents harvest onions. esakal

कापडणे (जि. धुळे) : जिल्ह्यात शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. पुन्हा एकदा सहा एप्रिलपासून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. (due to chances of unseasonal rains Farmers are fastly harvesting onion crop dhule news)

शेतकऱ्यांनी उर्वरित गहू, हरभरा, मका, ज्वारी व कांदा काढणीला वेग दिला आहे. मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे. महिला मजुरीचा दर एकशे ऐंशी ते दोनशेपर्यंत पोचला आहे. शेतकऱ्यांची कांदा काढणीची लगबग सुरु आहे. यासाठी मजुरांची मोठी आवश्यकता भासत आहे. शालेय विद्यार्थीही हातभार लावत आहेत.

परिसरात रब्बीचा हंगाम आवरण्यासाठी हार्वेस्टर आणि मोठ्या थ्रेशर मशिनसह मिनी हार्वेस्टरचा मोठा उपयोग होत आहे. यासाठी संदीप पाटील, नारायण माळी, गजू माळी आदी हार्वेस्टर व थ्रेशर मालक दिवसरात्र हंगाम आवरण्यासाठी मदत करीत आहेत.

स्थानिक पातळीवरच मशिनरी उपलब्ध होत असल्याने मोठ्या प्रमाणात हंगाम आवरला जात आहे. गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने गहू, ज्वारी आणि मका आडवा पडला आहे. हंगाम आवरण्यासाठी अधिकची मजुरी द्यावी लागत आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

A school girl helping her parents harvest onions.
Nashik News : यंदा 100 टक्के निधी झाला खर्च; सर्वसाधारण आणि आदिवासी उपयोजनेला यश!

कांदा काढणीस अधिक वेग

सहा एप्रिलपासून पुन्हा वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तशा पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. शेतकऱ्यांनी कांदा काढणीस अधिक प्राधान्य दिले आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक मजुरांकडून कांदा काढणी सुरु आहे. कांद्याला अधिकचा दर नाही. नुकसान होण्यापेक्षा काढलेला बरा, असे म्हणत काढणीस वेग दिला आहे.

प्रती क्विंटलला नऊशेचा दर

कांद्यास धुळेसह प्रसिद्ध इंदूरच्या बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. मात्र न परवडणारा दर मिळत आहे. प्रती क्विंटलला नऊशेपर्यंतचा दर आहे. कांद्याला किमान दोन हजारापर्यंतचा दर मिळाल्यास परवडते. सध्या काढणीचा खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्‍यांनी सांगितले.

"गेल्या तीन वर्षांपासून अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पिकांचे नुकसान होते. सरकारकडून हमी भाव मिळत नाही. काढणीचाही खर्च निघत नाही. शासनाने हमी भाव देण्यापेक्षा उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा."- आत्माराम पाटील, माजी जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना धुळे

A school girl helping her parents harvest onions.
Dhule News : उड्डाणपुलाखालील भिंती वेधताहेत लक्ष; थोर व्यक्तींची रेखाटली हुबेहुब छायाचित्रे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com