
Obesity Disorders : लठ्ठपणामुळे मुला- मुलींना जडू शकतात गंभीर आजार! विविध शाळांत लठ्ठपणावर जनजागृती
धुळे : लठ्ठपणा जनजागृती व उपचार कार्यक्रमांतर्गत विविध शाळांत मुला-मुलींची लठ्ठपणाबाबत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत १४ मुले व ११ मुली लठ्ठ आढळून आली. मुलांमधील लठ्ठपणाची ही समस्या भविष्यात विविध गंभीर आजारांना आमंत्रण देणारी ठरू शकते.
या पार्श्वभूमीवर श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विविध शाळांमध्ये जनजागृती केली. (Due to obesity boys and girls can get serious diseases Awareness on obesity in various schools dhule news)
लठ्ठपणा/स्थूलता कमी वयात आढळणे ही एक गंभीर बाब आहे. अशा आजारामुळे मुले, मुलींमध्ये भविष्यात मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्तात चरबीचे प्रमाण वाढणे, मानसिक आजार होण्याची भीती असते.
अशा प्रकारचे आजार नव्या पिढीत होऊन नयेत. जर असतील तर त्याचे उपचार आणि प्रतिबंध कसे करावे याबाबत जनजागृती व उपचार कार्यक्रम शहरातील एसव्हीकेएम सीबीएसई शाळा, सिस्टेल इंग्लिश मीडियम स्कूल, आर. आर. पाडवी नूतन विद्यालय, अभिजित पाटील जि. प. महाविद्यालय, मोराणे, जवाहर नवोदय विद्यालय येथे झाले.
श्री भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी लठ्ठपणा/स्थूलता या विषयावर मार्गदर्शन केले. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण मोरे, डॉ. अजित पाठक, डॉ. जिनेंद्र जैन, डॉ. लीना धांडे, डॉ. संजय अग्रवाल, डॉ. सारिका पाटील आदींनी प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली.
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
दरम्यान, या शाळांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय पथक व समाजसेवा अधीक्षक यांनी मुलांची उंची, वजन व त्यानुसार BMI (Body mass Index) याची माहिती घेतली. यात एकूण ७७४ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
की ४६९ मुलांची व ३०५ मुलींची लठ्ठपणाबाबत तपासणी झाली. यात १४ मुले व ११ मुली लठ्ठ आढळून आले. या अभियानासाठी डॉ. अनाम सिद्दिकी, डॉ. सिद्धार्थ कांबळे, डॉ. बन्सी, डॉ. प्रज्ञा, डॉ. हृषीकेश, लघुलेखक प्रीतेश कोर, सुदेश मानकर, समाजसेवा वैद्यकीय अधीक्षक जगताप, अभय पिंपळे, शरद देसले, श्री. साठे, श्री. मालुसरे, रानाजी पाडवी, श्री. अहिरराव, अंजली राठोड, अलका पाटील आदींनी परिश्रम घेतले.