"डिग्निटी राइड'द्वारे दिव्यांगांना प्रोत्साहन 

"डिग्निटी राइड'द्वारे दिव्यांगांना प्रोत्साहन 

नाशिक - "प्रतिष्ठेसह जगा' असा संदेश देण्यासाठी आज नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे "डिग्निटी राइड' सायकल रॅली झाली. या रॅलीद्वारे दिव्यांगांविषयी आदरभाव व्यक्‍त करण्यात आला. रॅलीत सुमारे पंधराहून अधिक तीनचाकी सायकलस्वारांनी सहभाग नोंदविला. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अन्य सायकलपटूंनीही सहभाग घेतला. 

सकाळी सातला राजीव गांधी भवनपासून पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरवात झाली. तेथून गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौक, अशोक स्तंभ, मेहेर सिग्नल, सीबीएसमार्गे त्र्यंबक नाका, जिल्हा परिषदेसमोरील मार्गावरून जात ए टू झेड सायकल्स येथे रॅलीचा समारोप झाला. दिव्यांग सायकलिस्टचा उत्साह वाढविण्यासाठी सायकलपटूही त्यांच्याबरोबर सहभागी झाले. 

दिव्यांगांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन त्यांच्यासोबत आहे, असे रॅलीद्वारे पटवून देण्यात यशस्वी झाल्याचे समाधान असल्याचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी यांनी सांगितले. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तू बोडके यांनीही मनोगत व्यक्‍त केले. दिव्यांगांच्या सायकल्सची पूर्ण देखभाल करणाऱ्या ए टू झेड सायकल्सकडून मच्छिंद्र सूर्यवंशी यांना एक तीनचाकी सायकल भेट देण्यात आली. 

नाशिक सायकलिस्टचे उपाध्यक्ष योगेश शिंदे, मनीषा भामरे, डॉ. मनीषा रौंदळ, सोफिया कपाडिया, नीता नारंग, वैभव शेटे, विजू पाटील, विशाल उगले, नाशिक जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे नितीन नागरे आदी उपस्थित होते. रॅली यशस्वी करण्यासाठी प्रहार संघटनेचे दत्तू बोडके, प्रकश चव्हाण, मनीष दराडे, अमोल घुगे, जगन काकडे, वैभव नागरे यांच्यासह ए टू झेड सायकल्सचे कुतबी मर्चंट आदींनी परिश्रम घेतले. 

पंढरपूरवारीसाठी दिले आमंत्रण 
वेगळे उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे 23 ते 25 जूनदरम्यान पंढरपूर सायकलवारी काढली जाईल. या सायकलवारीसाठीही दिव्यांग सायकलिस्टना आमंत्रित करण्यात आले असून, याबाबत प्रहार संघटना लवकरच निर्णय कळविणार असल्याचे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com