नाशिक - ई-शॉपींना परवानगीची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

राजेंद्र बच्छाव
शनिवार, 24 मार्च 2018

इंदिरानगर (नाशिक) : गेल्या अनेक दिवसांपासून इंदिरानगर भागात सुरू असलेल्या आॅनलाईन ट्रेडींगद्वारे शेकडोंची साखळी निर्माण करून मोठा परतावा देण्यात येईल अशा पध्दतीचा व्यवसाय करणाऱ्या ई-शॉपीच्या चालकांना नेाटीस बजावत संबंधित व्यवसायासाठी कोणत्या विभागाच्या परवानगी घेतल्या आहेत याची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले असून तो पर्यंत हा व्यवसाय बंद करण्यास सांगितले आहे.

याबाबत पोलीस आणि स्थानिक नागरीकांच्या म्हणण्यानुसार कलानगर चौकात हा व्यवसाय सुरू होता. सुरवातीला आठशे रुपये गुंतवून संबधितांना आॅनलाईन एक वस्तू विकली जात असे. अशा पंचवीस गुंतवणूकदारांनी प्रत्येकी ८०० रुपये गुंतवले की, हमखास १५० रुपयांचा परतावा असे स्वरूप होते. गुंतवणूकक दारांची संख्या पंचवीसच्या पटीत आणि त्या प्रमाणात गुंतवणूक देखील जशी वाढेल त्या प्रमाणात परतावा असा दावा संबधीत संचालक करत होते.

शेवटी गुंतवणूकदारांची संख्या ५ लाख आणि प्रत्येकी गुंतवणूक ४८०० रुपये इतकी झाल्यानंतर हमखास १० लाख परतावा अशी साधारण योजना होती.अल्पावधीत मोठा प्रतिसाद येथे मिळाला होता.सायंकाळी मोठी गर्दी होत असल्याने काहींनी पोलीसांना याबाबत शहनिशा करण्याची विनंती केली असता पोलीसांनी संबधीतांना बोलावून नक्की काय योजना आहे आणि त्याला कोणत्या खात्याची परवानगी आहे याबाबतचे कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली असून तो पर्यंत हा व्यवसाय बंद करण्यास सांगितले आहे. 

आता पर्यंत मोठ्या परताव्याच्या आशेने अनेक ठीकाणी फसवणूकीचे प्रकार घडले आहेत.उपरोक्त योजनेबाबत काही नागरीकांनी दीलेल्या माहीतीनुसार संबधीत चालकांना पोलीस ठाण्यात बोलावून विचारपूस केली असून त्यांच्यावर विश्‍वास न ठेवता त्यांना कोणत्या विभागाची परवानगी आहे त्याचे रीतसर कागदपत्रे सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली असून तो पर्यंत व्यवसाय बंद करण्यास सांगितले आहे.नागरीकांनी देखील याबाबत पोलीसांच्या पुढील सुचनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे वरीष्ठ पोलिस निरीक्षक  नारायण न्याहळदे यांनी सांगितले. 

Web Title: e shoppe have to submit permission documents in nashik