ई-वे बिल प्रणाली कार्यान्वित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

नाशिक - देशात एप्रिलपासून सुरू झालेल्या ई-वे बिल प्रणालीच्या अंमलबजावणीची तयारी पूर्णत्वास आली आहे. पूर्वीच्या विविध करांचे एकत्रीकरण करून नव्याने इतर राज्यांत सुरू झालेली ई-वे बिल पद्धत जूनपासून महाराष्ट्रात सुरू होत आहे.

देशात आणि राज्यात 50 हजार आणि त्याहून आधिक मूल्यांच्या मालाच्या वाहतुकीसाठी 1 एप्रिलपासून ई-वे बिल प्रणाली पद्धत सुरू केली आहे. अडथळामुक्त वाहतूक पारंपरिक प्रक्रिया सुलभ करणे, चेक पोस्ट व नाक्‍यावरील वाहनांचा अवधी कमी करण्यासह पोर्टलद्वारे ई-वे बिलासाठी अनुकूल प्रणाली विकसित करण्याची ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे http://ewaybil.nic.in या पोर्टलवर ई-वे बिल तयार करणे शक्‍य झाले आहे.

वस्तू व सेवाकर आयुक्तालयातर्फे त्यासाठीची प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे.
मालवाहतुकीसाठी आता मोबाईल किंवा एसएमएसद्वारे, लॅपटॉप, संगणक, ऑनलाइन किंवा एन्‍रॉईड मोबाईलद्वारे पोर्टलशी कनेक्‍ट होऊन व्यापाऱ्यांना ई-वे बिल तयार करणे शक्‍य होणार आहे. पोर्टलद्वारे ई-वे प्रणालीने मालवाहतुकीची सोय केल्याने नागरिक व व्यापाऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहान सेवाकर विभागाने केले आहे.

Web Title: e-way bill process