शहादा तालुक्यात जाणवले भुकंपाचे धक्के

शहादा तालुक्यात जाणवले भुकंपाचे धक्के

शहादा : नंदूरबार जिल्ह्यातील प्रकाशा रस्ता परिसर स्वामी विवेकानंदनगर व त्या भागातील नवीन वसाहती आज सकाळी नऊ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सावळदा ता. शहादा येथील भूकंपमापन केंद्रावर या धक्क्यांची नोंद झाली आहे. सुमारे 3.2 रिश्टर स्केलचे हे धक्के असून, त्याचा केंद्रबिंदू पालघर आहे.

आज सकाळी पावणेनऊ ते साडेनऊच्या सुमारास नागरिकांना अचानक जमीन हलत असल्याचे जाणवले. सर्वप्रथम नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पंधरा मिनिटांच्या कालावधीनंतर पुन्हा जमीन हादरत असल्याचे जाणवले. त्यानंतर हा धक्का भूकंपाचा धक्का आहे, अशी चर्चा सुरू झाली.

विसरवाडी खेतिया महामार्गाच्या कोळगाव ते खेतिया या भागाचे काम प्रगतीपथावर आहे. सदरचा रस्ता हा शहादा शहरातून जात आहे .या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात खडी मुरूम व माती आणली जात आहे. अवजड मशिनरी जेसीबी पोकलांड यांच्या साह्याने काम सुरू आहे. या रस्त्यावर अवजड मशिनरीच्या साह्याने काम सुरू असून, त्याचे कंपन जाणवत असल्याचा अंदाज परिसरातील नागरिकांकडून वर्तवला जात होता.

पुन्हा दुसरा धक्का बसल्याने व तो पहिल्या धक्यापेक्षा जास्त असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले. अनेक नागरिकांनी खात्री करण्यासाठी रस्त्याच्या कामावर आले असता तेथे अवजड मशिनरीच्या साह्याने काम सुरू नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते दोन्ही धक्के हे भूकंपाचे असल्याचे खात्री झाली.

याबाबत घडलेल्या घटनेनंतर नागरिकांनी तहसीलदार मनोज खैरनार यांना घटनेची कल्पना दिली. खैरनार यांनी सावळदा तालुका शहादा येथील नर्मदा सरोवराचे भूगर्भातील हालचालींची नोंद घेणारे तसेच भुकंपमापन केंद्रास चौकशी करून माहिती देण्यास सांगितली. स्वतः त्या केंद्रास भेट देऊन माहिती जाणून घेतली असता शहाद्यात 3.2 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के सकाळी सव्वानऊच्या सुमारास जाणवले असून, या भूकंपाचा केंद्रबिंदू पालघर आहे. गेल्या काही दिवसांपासून पालघर व परिसरात भूकंपाचे धक्के जाणवत आहे. जाणवलेले भूकंपाचे धक्के केंद्रबिंदू पालघर असल्याचे स्पष्ट झाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com