पेठ तालुक्‍यात भूकंपाचा सौम्य धक्का

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

पेठ - तालुक्‍यातील गोंदे, भायगाव परिसराला मंगळवारी सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भायगावच्या सरपंच शेवंताबाई भोंडवे यांनी ही माहिती तहसीलदार हरीश भामरे यांना कळविली.

पेठ - तालुक्‍यातील गोंदे, भायगाव परिसराला मंगळवारी सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भायगावच्या सरपंच शेवंताबाई भोंडवे यांनी ही माहिती तहसीलदार हरीश भामरे यांना कळविली.

सकाळी पावणेआठच्या दरम्यान जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता 2.7 रिश्‍टर स्केल होती. याबाबत गोंदे येथील सरपंच विजय माळगावे म्हणाले, की गेल्या काही वर्षांपासून या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवतात. आज सकाळी जाणवलेल्या धक्‍क्‍याची नोंद "मेरी'च्या केंद्रात झाली आहे. नाशिकपासून 32 किमी. अंतरावर 2.7 रिश्‍टर स्केलचे हे धक्के जाणवल्याचे "मेरी'तून अधिकृतपणे सांगण्यात येते.

Web Title: earthquake in peth tahsil

टॅग्स