शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मिळणार शिक्षण कार्ड

विजय पगारे : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 26 डिसेंबर 2016

इगतपूरी :- राज्यातील शाळाबाह्य मुलांचे दुसरे सर्वेक्षण जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार आहे. जे विद्यार्थी शाळाबाह्य आढळतील अशा विद्यार्थ्यांना शिक्षण कार्ड देण्याची शिक्षण विभागाची योजना आहे,असे शिक्षण विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे

शाळेमध्ये वारंवार शाळाबाह्य आढळणा-या विद्यार्थ्यांची सेल्फी काढण्यात येईल,अशा विद्यार्थ्यांचा डाटा तयार करून तो शिक्षण विभागाकडे संग्रहित करण्यात येईल,जेणेकरून एखादा वीटभट्टी,उसतोडणी कामगाराचा मुलगा अन्य जिल्ह्यात स्थलांतरित झाला तरी त्या विद्यार्थ्याला शिक्षण कार्डाच्या सहाय्याने गटशिक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून शोधून काढून त्या विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश देऊन त्याचे पुढील शिक्षण देण्यात येईल, असे प्रस्तावित करण्यात आले आहे

दरम्यान राज्यातील पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन,पुस्तके व गणवेश देण्यासाठी करावयाची उपाययोजना प्रभावी करण्यासाठीही नियोजन करण्यात येत आहे यापुढील काळात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करताना एनजीओंचे सहकार्य घेण्यात येईल.तसेच लोकप्रतिनिधींनीही या कामात सहकार्य करावे,असे आवाहनही करण्यात आले आहे

Web Title: education card to external students