शिक्षण खाजगी शाळेत अन् परिक्षा आदिवासी आश्रम शाळेत

pune
pune

तळवाडे दिगर (नाशिक) : सध्या दहावी व बारावीच्या परिक्षांचा काळ सुरु असून दहावीच्या परीक्षाचा १०० टक्के निकाल लावण्यासाठी बागलाण तालुक्यातील खाजगी शैक्षणिक संस्थाचालक चांगलेच कामाला लागले आहेत. आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी पास करून शाळाचा शंभर टक्के निकाल लावण्यासाठी शाळेपासून २५ ते ३० किलोमीटर दूर पर्यंत जाऊन आदिवसी भागातील आश्रमशाळेत परिक्षा देण्यासाठी धाव
घेतली जात आहे.

तालुक्यातील काही खाजगी शाळा तसेच इंग्लिश मिडीयम शाळामध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक फी घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. मात्र, काही शाळामध्ये सर्रास शैक्षणिक पात्रता नसणाऱ्या शिक्षकांना दोन तीन हजार रुपये मानधन देवून विद्यार्थ्यांना शिकवले जाते.  नंतर परीक्षा काळात शाळेपासून दूरवर असलेल्या एखाद्या आदिवासी भागातील आश्रमशाळेत जाऊन परीक्षा दिल्या जातात.  गैरमार्गाचा अवलंब करून सर्व विद्यार्थ्यांना पास केले जाते असा व्यवसायच काही शिक्षण संस्थांनी सुरु केला आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा म्हटलं की, त्यात कॉपीचे प्रकार घडू नयेत यासाठी बोर्डाकडून दरवर्षी खबरदारी घेतली जाते तरीही अनेक परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडत असल्याचे चित्र हे दिसतच असते. त्यासाठी शासनाने शाळेपासून जवळचे केंद्र शाळेला दिले पाहिजे. मात्र,  चिरीमिरी घेऊन शिक्षण क्षेत्रातीलच अधिकरी शाळा मागेल ते केंद्र देतात.

पालकांनीही व्हावे जागृत
गेल्या ६ वर्षांपासून कॉपी विरुद्ध एकाकी लढा देतो आहेत. प्रत्येक वर्षी नाशिक बोर्डात लेखी कळविले, समक्ष फोन करून कळविले व विद्यार्थ्यांमध्ये जागृतीही करत आहेत. प्रत्येक वर्षी विद्यार्थी, पालक व संस्थाचालकांचा रोष घेत आहोत. परंतु आता थोडाफार फरक जाणवायला लागला आहे. एसएससी बोर्डाचे सचिव गायधनी यांना यावर्षी कळविले तर, टोलवाटोलवी केली नंतर फोनही उचलला नाही. परंतु अध्यक्ष पाटील यांनी फोनची त्वरित दखल घेऊन वेळोवेळी स्क्वॅड पाठविले. या सगळ्या प्रकाराला संस्थाचालक खोटे निकाल दाखविण्याकरिता व शिक्षकही त्यांची सेवा वाचविण्यासाठी या कॉपीसाठी १०० % जबाबदार आहेत. त्याबरोबर मूर्ख पालकही कॉपी पुरवायला स्वतः जातात. अभ्यास करायला सांगण्यापेक्षा कॉपी पुरविण्यासाठी पोलीस यंत्रणा व सुपरवायझर शिक्षक यांना आर्थिकरित्या मॅनेज केले जाते हे दुर्दैव.

''मागील वर्षी तक्रारीवरुन १५०च्या आसपास शिक्षक बोर्डात चौकशीला बोलाविले. रोष घेतला पण, चांगले काय वाईट काय हेच शिक्षक शिकवीत नाहीत. प्रत्येक सेंटरला सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे शिवाय बाहेरील शिक्षकांचा बैठे स्कॉड बसविणे व सुपरवायझर यांना आर्थिक दंड व सेवेवर कार्यवाही हाच पर्याय असु शकतो. अथवा आमच्या सारख्या शाळेत लेखी हमी घेवून सेन्टर द्यावे . परंतु विद्यार्थी मठ्ठ होऊ लागलेत याला जबाबदार संस्था,शिक्षक व पालकच आहेत? यामुळे आमच्या सारख्या प्रामाणिक कॉपी फ्री परीक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांचे अतोनात नुकसान होत आहे.''
- डॉ प्रसाद सोनवणे, (संस्थापक, सिद्धि इंटरनॅशनल अकॅडेमी,करंजाड, संस्थापक, महाराष्ट्र स्टेट इंग्लिश मिडीयम स्कुल्स असो) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com