वातावरण बदलाने दादरच्या उत्पादनात घट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

अमळगाव (ता. अमळनेर) : सद्यस्थितीतील वातावरण बदलाने सर्वच घटकांवर विपरित परिणाम होत आहे. यामुळे उत्पन्नात घट येण्याची शक्‍यता आहे. दादरच्या पिकामुळे शेतकऱ्यांना मोठा झटका बसला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले झाले होते.

ऑक्‍टोंबर, नोव्हेंबर महिन्यापर्यन्त पाऊस सुरू राहील्याने खरीप हंगामाची मेहनत करायला उशीर झाला. त्याचा परिणाम पेरणीवर होऊन दादर पिकाची पेरणीस ऊशीर झाला. त्यामुळे पिकाची वाढही खुंटली आहे. त्यातल्यात्यात दादरला चार पाच फुटवे फुटल्याने कणीस लहान लहान निघू लागली आहेत.

प्रत्येक वर्षी दव बिंदुचेही प्रमाण वाढलेले असते पण यावर्षी ते कमी प्रमानात पडल्याने त्याचाही परीणाम दादर पिकावर झाला असून, उत्पन्नात घट येणार आहे. मगील वर्षी दुष्काळाची झळ बसल्याने उत्पन्नात कमी आली होती. यावर्षी पाउल होऊनही उत्पन्न कमी या मुळे शेतकरीचीं चिंता वाढली.

Web Title: effect on production due to change in climate