ईदसाठी बारा संशयितांना तात्पुरता जामीन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

जळगाव - व्हॉटस्‌ऍपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरून गोलाणी व्यापारी संकुलात झालेल्या दंगलप्रकरणी अटकेतील बारा संशयितांना ईदच्या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांसाठी तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला. कायम जामिनासाठी दोन दिवसांनी न्यायालयात पुन्हा कामकाज होऊन निर्णय दिला जाईल.

जळगाव - व्हॉटस्‌ऍपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरून गोलाणी व्यापारी संकुलात झालेल्या दंगलप्रकरणी अटकेतील बारा संशयितांना ईदच्या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांसाठी तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला. कायम जामिनासाठी दोन दिवसांनी न्यायालयात पुन्हा कामकाज होऊन निर्णय दिला जाईल.

गोलाणी मार्केटमध्ये 24 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जमावाने दगडफेक करून तोडफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी शहर पोलिसांत 12 संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यात मोहंमद बिलाल मोहंमद फारुक बागवान, वसीम खान अब्दुल खान, इम्रान अब्दुल खान, मोहसीन शब्बीर बागवान, सय्यद कलीम झंवर अली, दानिश नासीर हुसेन, अमीर अली मोहंमद अली सय्यद, एनोद्दीन अनिनोद्दीन शेख, खान सलमान सलीम, अल्तमश गुलाम रसूल, मोहमंद जुबेर अब्दुल रहीम खाटीक, शेख शाकीर शेख शकील यांचा जामीन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळल्यावर सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला होता. न्या. ए. के. पटणी यांच्या न्यायालयात कामकाज झाले. सरकारपक्षाने जामिनाला तीव्र विरोध केला होता. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद पूर्ण होऊन न्यायालयाने सर्व बारा संशयितांना दोन दिवसांसाठी तात्पुरता सशर्त जामीन मंजूर केला आहे. बचावपक्षातर्फे ऍड. मोहसीन शेख, ऍड.शरीफ पटेल, ऍड. अजय सिसोदिया यांनी कामकाज पाहिले.

अटीशर्ती अशा...
- पंधरा हजाराच्या जातमुचलक्‍यावर जामीन
- केवळ 6 व 7 जुलैसाठी तात्पुरता जामीन
- 8 जुलैला 11 ते 12 दरम्यान न्यायालयात हजर राहावे
- 11 जुलै रोजी जामीन अर्ज चौकशीला राहील

अजिंठा चौक दगडफेकीत अटकपूर्व जामीन
अंजिठा चौकातील दगडफेकीच्या गुन्ह्यात संशयित असलेला इम्रान शरीफ खान ऊर्फ इम्रान गोबा मुलतानी याच्यातर्फे जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. न्या. पटणी यांच्या न्यायालयात कामकाज होऊन न्यायालयाने त्याला पंधरा हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सरकारपक्षातर्फे ऍड. केतन ढाके, बचावपक्षातर्फे ऍड. राशिद पिंजारी यांनी कामकाज पाहिले.

Web Title: For Eid temporary bail twelve suspects