कॅनव्हासवर अवतरले स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, आयफेल टॉवर

Eiffel Tower, Statue of Liberty on the canvas in Sakal Kalangan Programme
Eiffel Tower, Statue of Liberty on the canvas in Sakal Kalangan Programme

नाशिक - जगभरातील आश्‍चर्यकारक ठिकाणांपैकी असलेल्या स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, आयफेल टॉवर यांसह भव्य अशा महालाची प्रतिकृतीसह मनमोहनाऱ्या दृष्यानी सजलेल्या लंडन पॅलेसमध्ये आजचा "सकाळ-कलांगण'चा उपक्रम आयोजित केला होता. उपक्रमात सहभागी चित्रकारांनी कॅनव्हासवर थेट स्टॅच्यु ऑफ लिबर्टीपासून तर आयफेल टॉवर व अन्य देखणे दृष्य साकारले. अभिनेता चिन्मय उदगीरकर, अभिनेत्री गिरीजा जोशी-उदगीरकर व धनश्री क्षीरसागर यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले.

आजच्या या उपक्रमाप्रसंगी महापौर रंजना भानसी, "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, स्वामी नारायण ट्रस्टचे विश्‍वस्त माधव स्वामी महाराज, इंडियन हॉस्पीटॅलीटी कन्सेप्टस्‌चे सरव्यवस्थापक राज शर्मा, पर्यावरणप्रेमी राजेश पंडीत, ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार, सुलेखनकार नंदु गवांदे, व्यंगचित्रकार ज्ञानेश बेलेकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

या उपक्रमास महापौर रंजना भानसी यांनी शुभेच्छा देतांना नाशिकमध्ये कलावंतांसाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. फाळके स्मारकाचा विकास करून तेथे चित्रीकरणासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी या उपक्रमाच्या व्यासपीठावरुन व्यक्‍त केला. 

सकाळी आठपासूनच या उपक्रमास चित्रकारांनी हजेरी लावली होती. उशीरापर्यंत चित्रकार आपले चित्र रेखाटण्यात दंग झाले होते. दरम्यान सर्व पाहुण्यांचे स्वागत स्वामी नारायण शाळेच्या ढोल-ताशा पथकातर्फे वाजत गाजत करण्यात आले. त्यासाठी अर्चना नाटकर, विपुल अंधारे, गौरव शर्मा यांचे सहकार्य लाभले. तर उपक्रमाच्या आयोजनासाठी केशव अंबादास डिंगोरे यांचे सहकार्य लाभले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com