VIDEO : आश्रमशाळेजवळ चक्क 'इतके' साप मृतावस्थेत..संशय कायम... 

ज्ञानेश्वर पाटील : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

एकाच ठिकाणी एकूण आठ साप मृतावस्थेत आढळून आल्याने संशय व्यक्त केला जात आहे. हा प्रकार कोणी केला असावा व याचे नेमके कारण काय याबद्दल संशय निर्माण करण्यात येत आहे. या प्रकाराबाबत वनाधिकारी यांना याबाबत कळविण्यात आले असून हा प्रकार संशयास्पद आहे तसेच या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली. .

नाशिक : अंबोली येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेजवळ एकूण आठ साप मृतावस्थेत आढळले. येथील गोकुळ मेढे सकाळी म्हशी चारण्यासाठी गेले असता हे साप त्यांच्या निदर्शनास आले. याठिकाणी प्लॅस्टिक गोणी आढळून आली. त्यांनी सर्व प्रकार येथील पोलिस पाटील मेढे यांना सांगितला. वनाधिकारी यांना याबाबत कळविण्यात आले, हा प्रकार संशयास्पद असून, या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली. .

साप सुरक्षित आहेत ?

अशाप्रकारे  एकाच ठिकाणी एकूण आठ साप मृतावस्थेत आढळून आल्याने संशय व्यक्त केला जात आहे. हा प्रकार कोणी केला असावा व याचे नेमके कारण काय याबद्दल संशय निर्माण करण्यात येत आहे. हल्ली कुठलाही साप पकडला की सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओद्वारे प्रदर्शन करण्याचे नवीनच फॅड सुरू झाले आहे. कायद्यानुसार हा गुन्हा आहे. अशा चित्रफिती प्रसिद्ध करून त्यातून प्रसिद्धी मिळवणे किंवा त्यात वापरल्या जाणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून पैसे कमावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेसापाबद्दलचे समाजातील गैरसमज, अंधश्रद्धा, साप पकडणाऱ्यांचे अज्ञान, अतिसाहस, बेकायदा प्रदर्शन आणि या सर्वांकडे वन विभागाचे असलेले दुर्लक्ष यामुळे साप खरंच सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडतो. नागपंचमीला नागाची पूजा करण्याची प्रथा आहे, पण केवळ पूजा करून साप वाचणार नाहीत. त्यासाठी ठोस उपाय हवेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight snakes were found dead in Amboli Nashik News