सातपूरमधील आठ धार्मिक स्थळांवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

नाशिक - २००९ नंतरची शहरातील धार्मिक स्थळांची अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सलग दुसऱ्या दिवशी सुरू राहिली. दुसऱ्या टप्प्यात सातपूर विभागातील आठ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली. 

नाशिक - २००९ नंतरची शहरातील धार्मिक स्थळांची अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सलग दुसऱ्या दिवशी सुरू राहिली. दुसऱ्या टप्प्यात सातपूर विभागातील आठ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली. 

सकाळी दहाला पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू झाली. सकाळच्या सुमारास चार, तर दुपारनंतर चार, असे एकूण आठ धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले. विशेष म्हणजे, विश्‍वस्तांनी देवतांच्या मूर्ती स्वतःहून काढून घेत प्रशासनाला सहकार्य केले. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त रोहिदास बहिरम, विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत, जयश्री सोनवणे, नितीन नेर, राजू गोसावी, ए. पी. वाघ, शरद वाडेकर, सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे, पोलिस निरीक्षक अविनाश सोनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जगन्नाथ गायकवाड आदी उपस्थित होते. शंभर पोलिसांचा बंदोबस्त, अतिक्रमण विभागाचे सहा ट्रक, दोन जेसीबी व तीन ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने बांधकामे हटविण्यात आली.
 

हटविण्यात आलेली धार्मिक स्थळे

  • कोळीवाडा येथील देवी मंदिर
  • पंडित चौकातील श्रद्धा साई इच्छापूर्ती व साई सैलानी मंदिर
  • आनंदवलीच्या काळेनगरमधील श्री दत्त मंदिर
  • ए.बी.बी. सर्कल येथील साईबाबा मंदिर
  • पाइपलाइन रोड येथील साईबाबा मंदिर
  • होरायझन स्कृलसमोरील सप्तशृंगीमाता मंदिर
  • गंगापूर रोडवरील दत्त मंदिर
  • हॉटेल पंचवटी इलाइटलगतचे मारुती मंदिर

अतिक्रमण काढण्याबाबत महापालिकेकडून दुजाभाव
रहदारीला अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. पंचवटी विभागातील विडी कामगारनगरच्या संविधान स्तंभ हटविण्याबाबतही नोटीस बजावली आहे. यामुळे दलित पॅंथरने महापालिका आयुक्तांना निवेदन देत कारवाई टाळावी व येथील चौकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव कायम करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार २००९ नंतरची अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना आहेत. मात्र, हा स्तंभ २००३ ला बांधला आहे. वाहतुकीला अडथळा होत नाही, तरी महापालिकेने नोटीस बजावली आहे. याच भागात एक मंदिर असून, त्याला नोटीस बजावली नसल्याने महापालिका दुजाभाव करीत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. पॅंथरचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश नेटावटे, चंद्रभान पगारे, हरिदास भालेराव, शिवाजी खरात, रमेश मुंडे, किरण सरदार, सागर वाकचौरे, दीपक खरात, मिथुन सुरवाडे आदी उपस्थित होते.

Web Title: eight spots on religious hammer in satapur