वरखेडे-लोंढे' प्रकल्पासाठी मिळणार 'नाबार्ड' कडून 80 कोटी

वरखेडे-लोंढे' प्रकल्पासाठी मिळणार 'नाबार्ड' कडून 80 कोटी

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : राज्य विधीमंडळात आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात वरखेडे-लोंढे बँरेज प्रकल्पासाठी जलसंपदा विभागातर्फे 22.94 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी नाबार्डकडून 80 कोटी असा एकूण 102.94 कोटीचा निधी या प्रकल्पाच्या कामाला उपलब्ध होणार आहे. आमदार उन्मेष पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही तरतूद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

तालुक्यात अत्यंत महत्वकांक्षी असलेल्या वरखेडे-लोंढे बॅरेज प्रकल्पाचे तेरा गेट बनविण्याचे काम पूर्णत्वाकडे आले असून या कामाला वेग आला आहे. प्रकल्पावर सर्व प्रकाराची यंत्र सामुग्री उपलब्ध आहे. गिरणा नदीपात्रातील कामाला सुरवात झाली आहे. या प्रकल्पात पुढील वर्षाच्या पावसाळ्याचे पाणी अडविण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. बळीराजा सिंचन योजनेत या प्रकल्पाचा समावेश झाल्याने यासाठी नाबार्ड कडून 214 कोटीचे कर्ज देखील मंजूर असून या कर्जाचा पहिला 80 कोटीचा हाप्ता व अर्थसंकल्पात 22.94 कोटी एकूण 102.94 कोटी रूपये या प्रकल्पाच्या कामासाठी मिळणार आहेत. येथे मोठ्या क्रेनद्वारे दरवाजाचे कामे ही धरण भागातील वरच्या बाजुला सुरू आहे. या एका दरवाजाची लांबी 12 मीटर आहे.

गिरणा पात्रात काम सुरू :
गिरणा नदी पात्रातील खोदकाम सुरू केले आहे.त्यामुळे येथे खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. यासाठी आधुनिक टेक्नॉलॉजी वापर करण्यात येत आहे. गिरणा पात्रातील खड्डे तयार करून त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे काम झाल्यावर गेट उभारणीचे काम  करण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

या प्रकल्पाची किंमत 526. 64 कोटी असुन याला आता नाबार्ड कडून कर्जपुरवठा देखील मंजुर झाला आहे. या कामावर नुकतेच केंद्रीय जल आयोगाचे वडोदरा गुजरात कार्यालयाचे संचालक एम. वर्षीने व उपसंचालक व्ही. एल. भास्कर प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता सचिन पाटील यांनी पहाणी दरम्यान झालेल्या कामाची माहिती दिली.

असा मिळाला निधी :
2014- 15 - 10.24 कोटी  
2015- 16 - 19.54 कोटी  
2016- 17 - 13 कोटी व 15 कोटी (अतिरिक्त)  
2017- 18 - 40 कोटी
2018 -19 - 20 कोटी
2019-20 - 22.94 (नाबार्ड 80 कोटी)
असा एकूण - 102.94 कोटी 

वरखेडे-लोंढे प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून सुरवातीपासूनच आपले सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व खासदार ए. टी. पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून आजपर्यंत भरीव निधी मिळवून दिला आहे.तालुक्यातील इतिहासात पहिल्यांदाच एवढा भरघोस निधी मिळून दिला आहे. - उन्मेष पाटील, आमदार, चाळीसगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com