खडसेंची मागणी न्यायालयाने फेटाळली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

जळगाव - "न्यायालयात मानहानीचे अनेक खटले प्रलंबित आहेत. सामान्य दाव्यांप्रमाणेच आपल्या खटल्याचेही कामकाज होईल,' या शब्दांत न्यायालयाने आज माजी मंत्री एकनाथ खडसे यांची तत्कालीन आमदार व विद्यमान सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध दाखल दाव्यातील कामकाज जलदगतीने चालविण्याची मागणी फेटाळून लावली. याप्रकरणी आता पुढील सुनावणी 14 ऑगस्टला होणार आहे.

दोन वर्षांपूर्वी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे मंत्री असताना त्यांच्यावर मंत्रिपदाचा गैरवापर करून पॉलिहाउसचे अनुदान लाटल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी खडसेंनी जिल्हा न्यायालयात पाटील यांच्यावर पाच कोटींच्या मानहानीचा दावा दाखल केला असून, त्यावर आज दिवाणी न्यायाधीश एस. आर. गायकवाड यांच्या न्यायालयात कामकाज झाले.

दमानियांवर फौजदारी दाव्यासाठी अर्ज
बदनामीप्रकरणी अंजली दमानियांविरोधात विविध 22 ठिकाणी खटले दाखल करणाऱ्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दमानियांच्या अलीकडच्या "ट्विट'बद्दल जळगाव न्यायालयात आणखी एका फौजदारी दाव्यासाठी अर्ज सादर केला आहे. या अर्जात दमानियांविरोधात न्यायालयाच्या अवमान प्रकरणाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

Web Title: eknath khadse demand reject by court