मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहिल्यामुळे ही अवस्था- एकनाथ खडसे

मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहिल्यामुळे ही अवस्था- एकनाथ खडसे

जळगांव- चाळीस वर्षांच्या काळात अनेक मंत्रिपदं मिळाली, मुख्यमंत्रीही होऊ, मात्र मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहिल्यामुळेच आपण कोणताही गुन्हा केलेला नसतानाही आपली अशी अवस्था झाली, असे भाजपनेते एकनाथ खडसेंनी म्हटले आहे.

खडसे म्हणाले की, मंत्रिपदावर असताना जाती-धर्माच्या आधारावर नव्हे तर मुस्लिम समाज मागास असल्याने सामाजिक भावनेतून आपण नेहमीच मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केला. जळगाव जिल्ह्यातील सावदामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित 'एक शाम नाथाभाऊ के नाम' या मुशायराच्या कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते.

मंत्रिपदावर असताना मुस्लिम वख्त बोर्डाच्या महागड्या जमिनी ताब्यात घेत असताना त्यातील एका जमिनीवरील इमारत पाडण्याची नोटीस दिली होती, ती जमीन अंबानींची निघाली. यावेळी केलेली कारवाई आमच्याकडे काही जणांना आवडली नाही. त्यावेळी मोठा दबावही आला होता. मात्र सामाजिक भावनेतून आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला होता, असंही खडसे म्हणाले.

मंत्रिपदाचं काय, येतात आणि जात असतात. 40 वर्षांच्या काळात आपण अनेक मंत्रिपद भूषवली असं खडसे सांगत असतानाच 'पुढील काळात आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं' अशी इच्छा एका मुस्लिम कार्यकर्त्याने व्यक्त केली. यावर उत्तर देताना, मुख्यमंत्रीही होऊ, मात्र मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहिल्यामुळेच आपण कोणताही गुन्हा केलेला नसतानाही आपली अशी अवस्था झाली, असं सांगत खडसेंनी पुन्हा आपल्याच पक्षाविरोधातील खदखद उघड केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com