निवडणुकीच्या कामात  "चुकीला माफी नाही' 

निवडणुकीच्या कामात  "चुकीला माफी नाही' 

जळगाव ः लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी सर्वस्वी निवडणूक आयोगाच्या अखत्यारित काम करतात. निवडणूक कामात 100 टक्के बिनचूक काम म्हणजे अगदी कळत-नकळत झालेल्या लहानातल्या लहान चुकीलाही माफी नसते. म्हणून प्रत्येकाने विचारपूर्वक कामे करा. निवडणूक आयोगाच्या कामात चुकीला माफी नसते हे लक्षात ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज येथे दिल्या. 

येथील नियोजन भवन येथे आयोजित जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गात ते मार्गदर्शन करीत होते. अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, तहसीलदार शरद मंडलीक, लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त अधिकारी- कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

आधुनिक तंत्रज्ञानासाठी सज्ज व्हा 
श्री. ढाकणे म्हणाले, की निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून निवडणुकीसाठी नेमणूक झालेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे काम राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीपूर्वक पार पाडावे. शांतपणे, निवडणूक यंत्रणेतील गाव पातळीवरील तलाठी, ग्रामसेवकच नव्हे तर अगदी कोतवालांशी सुद्धा संपर्क ठेवावा. अत्याधुनिक यंत्र सामग्रीचा वापर करावयाचा असल्याने संबंधितांनी निवडणुकीतील यंत्रणेच्या नेहमी संपर्कात राहा. आपापसांत समन्वय ठेवून काम केल्यास अडचण येणार नाही. 
अपर जिल्हाधिकारी गाडीलकर, श्री. हुलवळे, श्री. कदम, यांनी आप-आपल्या मार्गदर्शनात लोकसभा निवडणूक 2019 साठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक पद्धतीने होणाऱ्या आगामी निवडणुकीत नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या जबाबदाऱ्यांबाबत सांगताना निवडणुककामी वापरण्यात येणाऱ्या यंत्र सामग्रीच्या वापरा विषयी माहिती दिली. उपस्थित तज्ज्ञांकडून निवडणूक यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखविले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com