Dhule : जिल्ह्यात 52 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat election

Dhule : जिल्ह्यात 52 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर

धुळे : जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक (Gram panchayat election ) जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादरीकरणासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा आणि निवडून आल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत या समितीकडून प्राप्त जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे. तसे हमीपत्र सादर करण्याची मुभा उमेदवारांना देण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील (प्रशासन) यांनी दिली. (Election for 52 Gram Panchayats declared in district Dhule News)

जिल्ह्यातील जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या धुळे तालुक्यातील दोन, साक्री तालुक्यात ४९ आणि शिंदखेडा तालुक्यातील एक, अशा एकूण ५२ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली. उमेदवारी (नामनिर्देशन पत्र) अर्जाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबविली जाणार आहे. आयोगाच्या सूचनेनुसार संबंधित तहसीलदारांमार्फत नमुना ‘अ’ ‘अ’ मधील निवडणुकीची नोटीस ५ जुलैला संबंधित ग्रामपंचायतींच्या ठिकाणी तसेच सर्व संबंधित ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल. या अनुषंगाने ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १६ व १७ जुलैला अनुक्रमे सुटीचा शनिवार व रविवार वगळून १२ जुलै ते १९ जुलैदरम्यान सकाळी ११ ते दुपारी तीनपर्यंत तहसीलदारांनी नमुना ‘अ’ ‘अ’मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी संगणक प्रणालीद्वारे सादर केलेली नामनिर्देशन पत्रे (ऑनलाईन नामनिर्देशन पत्राची सॉफ्ट कॉपीची परिपूर्ण भरलेली प्रत) स्वीकारावीत.

या कालावधीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे संगणक प्रणालीद्वारे प्राप्त नामनिर्देशनपत्राची छाननी २० जुलैला सकाळी अकरापासून करण्यात येईल. वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांना नामनिर्देशनपत्र २२ जुलैला दुपारी तीनपर्यंत मागे घेता येतील. यात दुपारी तीननंतर निवडणूक चिन्ह दिले जातील, तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी ४ ऑगस्टला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान घेण्यात येईल. ५ ऑगस्टला तहसीलदारांनी निश्चित केलेल्या ठिकाणी मतमोजणी होईल.

हेही वाचा: हिंगोणा येक्षील पाणी समस्या कायमची मिटणार

११ ऑगस्टपर्यंत आचारसंहिता लागू
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत (११ ऑगस्टपर्यंत) आचार संहिता लागू राहील. या क्षेत्रातील मतदारांवर विपरित प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही, अशी सूचनाही आहे.

हेही वाचा: Jalgaon : यावल अभयारण्यातील अतिक्रमण काढले

Web Title: Election For 52 Gram Panchayats Declared In District Dhule News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..